शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वादळी वा-यासह गारपीट

By admin | Updated: April 11, 2015 01:44 IST

संत्री, लिंबू, टरबूज, बिजवाई कांदे, आंबे भुईसपाट; लाखोंचे नुकसान.

मंगरुळपीर : तालुक्यातील वनोजासह शेलूबाजार परिसरात ९ एप्रिलच्या दुपारी ४ ते ६ दरम्यान जोरदार गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. सुसाट वार्‍यामुळे वनोजा येथील शेतकर्‍यांच्या शेतातील संत्री, लिंबू, आंबा तसेच टरबूज आदी फळपिकांचे लाखोंचे नुकसान झाले. बर्‍याच ठिकाणी मोठे वृक्ष विजेच्या खांबांवर पडल्याने आठ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. वनोजासह शेलूबाजार येथे घरांवरील टिनपत्रे वादळी वार्‍यामुळे उडून गेली. ती गोळा करताना नागरिकांची तारांबळ उडाली होती. तालुक्यातील वनोजा, शेलूबाजार भागात गुरूवारी दुपारी ४ ते ६ वाजताच्या सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यामुळे वनोजा येथील कमलाबाई वसंतराव राऊत, वैशाली सुनील राऊत व सुनीता अरविंद वैराळे यांच्या २२ एकरांतील जवळपास १७00 झाडांवरील संत्री जमिनीवर आली, तर काही झाडे उन्मळून पडली. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३0 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वनोजा येथील गजानन रामभाऊ राऊत यांच्या एक हेक्टरवरील लिंबाची संपूर्ण फळे झडून जमिनीवर सडा झाला. सोबतच सुशीलाबाई राजेंद्र राऊत यांच्या एक हेक्टर शेतातील टरबुजाचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्‍यामुळे दोन घरांची पडझड झाली. तालुक्यातील तपोवन येथील शरद येवले यांच्या शेतातील बिजवाई कांदय़ाचे हजारोचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बदलेल्या वातावरणामुळे फळबागधारक शेतकरी चिंतेत सापडले होते. ९ एप्रिलच्या वादळी पावसामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले. हाताशी येणारी पिके गेल्याने शेतकरी पार खचून गेला आहे. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामुळे सोयाबीनसह सर्व पिकांच्या उत्पादनात मोठी घसरण आली. झालेले नुकसान रबी हंगामातून भरून काढण्याचे स्वप्न शेतकर्‍यांनी बाळगले; मात्र निसर्गाचा प्रकोप चालूच आहे. नापिकीची नुकसानभरपाई हाती पडली नसतानाच निर्सगाची बळीराजावर वक्रदृष्टी पडली. शिरपूर, रिसोड तालुक्यातील वसारी, दापुरी, केशवनगर, मसला, भरजहागिर व किनखडा येथेही वादळ वार्‍यासह पाऊस बरसला. यामध्ये आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मालेगाव व रिसोड तालुक्यात शुक्रवारी ३.३0 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. सावरगाव जिरे परिसरात तुरळक गारांचा पाऊस झाला. वाशिम येथे १0 एप्रिलला रात्री ८ पासून जोरदार पावसास सुरुवात झाली.