शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

गारपिटीचा शेतीला तडाखा!

By admin | Updated: April 30, 2017 00:13 IST

पिकांचे नुकसान; सांगली, लातूर, बीड, उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

सांगली/लातूर : राज्यात उष्णतेचा कहर सुरू असताना अवकाळी पावसाने तोंड वर काढले आहे. सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला शनिवारी गारपिटीचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने परिसराला अक्षरक्ष: झोडपून काढले. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली. उद्या रविवारी (पान १२ वर)दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला. यामुळे आंबा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात चौसाळ्यासह हिंगणी खुर्द व बुदू्रक परिसरात पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ््यांचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून तीन दुभती जनावरे दगावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)हजारो क्विंटल तूर भिजलीमराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गारपिट झाली. चाकूर, जळकोट आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हजारो क्विंटल तूर या पावसामुळे भिजली़ गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात ही तूर मापाविना पडून होती, परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ ----------पारा चाळीशीपार विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा चाळिशीवर असून, मध्य महाराष्ट्रातील बुतांश जिल्ह्यातील तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. शनिवारी विदर्भातील ब्रम्हपुरीचे तापमान सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. विदर्भातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, खान्देशातील पाराही वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात नगर आणि मालेगाव मधील तापमानाचा पारा ४१.६ इतका नोंदविण्यात आला. द्राक्षबागांचे पुन्हा नुकसान महिन्याभरापूर्वी द्राक्ष हंगामाच्या काळात सांगलीतील सावळज (ता. तासगाव) परिसरात गारपिटीने बागांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा याच परिसरात अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची खरड छाटणी घेतली आहे. नवीन फुटवा असलेल्या बागांचे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबादमधील द्राक्ष पिकांनाही फटका बसला.