शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

दोन वर्षांपासून जिप्सम खत अप्राप्त

By admin | Updated: August 5, 2016 00:04 IST

चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता; मात्र वाशिम जिल्ह्यात पुरवठाच नाही.

वाशिम, दि. ४ - शेतक-यांना सबसिडीवर देण्यात येणारे 'जिप्सम' खत वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून आले नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ असून, शेतकर्‍यांची मागणी नसल्याने खताचा पुरवठा नाही, असा दावा कृषी विभागाने केला.वाशिम जिल्ह्यात सरासरी चार लाख ९ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र असून यावर्षी चार लाख तीन हजार ४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक अर्थात दोन लाख ८७ हजार २२६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून त्याखालोखाल तूरीचा पेरा ६३ हजार ५0१ हेक्टरवर झाला आहे. पाच हजार ८९७ हेक्टरवर एकूण तृणधान्याचा पेरा असून, ९१ हजार ४0५ हेक्टरवर एकूण कडधान्याचा पेरा आहे. १८ हजार ६३0 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्याने हलक्या प्रतीच्या अनेक जमिनी चिबडल्या. ऑगस्ट महिन्यातही दमदार पाऊस असल्याने मानोरा, कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर तालुक्यात शेतीचा बराचसा भाग चिबडून गेला आहे. त्यामुळे तूर, क पाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता असते, असा प्रगतशील शे तकरी व कृषी तज्ज्ञांचा दावा आहे. मानोरा तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी जिप्सम ख ताबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता, शासनाकडून जिप्सम खताचा पुरवठा झालाच नसल्याची माहिती समोर आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, गत दोन वर्षांपासून शासनाकडून जिप्सम खताचा पुरवठा बंद असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. शेतकर्‍यांची मागणी नसल्याने हा पुरवठा बंद असल्याचा दावा करण्यात आला.असा आहे जिप्सम खताचा फायदा..1. क्षारयुक्त जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सममुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारण्याचा मदत होते. परिणामी, जमिनीची सुपीकता वाढते. जमीन भुसभुशी त होते. जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.2. जमिनीची धूप कमी होते. तसेच पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सममुळे कमी होतात, असा दावा कृषी तज्ज्ञांनी केला. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही तसेच जिप्सममुळे िपकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेला गंधक जिप्सममुळे मिळतो. 3. जिप्सममुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जिप्सममुळे वातावरणातील जास्त तापमान पिके सहन करू शकतात.