शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्याचे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:55 IST

कारंजा लाड - कारंजा पोलिसांनी २८ आॅक्टोबरच्या सायंकाळी जप्त केलेले ४५ लाख रुपये किमतीचे गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे.

ठळक मुद्देगुटख्याचा काळाबाजार सुरूच कारंजा बनतेय मुख्य वळण केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - कारंजा पोलिसांनी २८ आॅक्टोबरच्या सायंकाळी जप्त केलेले ४५ लाख रुपये किमतीचे गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात कारंजा शहर परिसरात अवैध मार्गाने गुटख्याची वाहतूक होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने कारंजा मुख्य वळण केंद्र बनत असल्याची चर्चा आहे. गोपनिय माहीतीच्या आधारे कारंजा शहरात ४५ लाख रूपयाचा गुटखा तसेच १५ लाख रुपए किंमतीच्या ट्रकसह एकुण ६० लाख रूपयाचा गुटखा २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका पेट्रोलपंपानजीक जप्त केल्याची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व पोलीस चमूने केली होती. कारंजा शहरात एका पेट्रोल पंपाच्या मागे विमल गुटख्याने भरलेला ट्रक आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी त्वरीत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम.एम.बोडखे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस अधिका-यांनी त्वरीत घटनास्थळ गाठले. यावेळी गुटख्याने उभा असलेला एम.एच.३२ - क्यु ३३२ क्रमांकाचा ट्रक जप्त करून पोलीस स्टेशनना आणण्यात आला. रात्री १० वाजेपर्यंत ट्रकमध्ये असलेल्या गुटख्याच्या विमल पुडया व तबांखु पुडयाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ४५ लाख रुपये किंमतीचा गुटखा असल्याचे आढळून आले. सदर गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषधी प्रशासनाकडे रविवारी सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, अलिकडच्या काळात कारंजा येथे गुटखा जप्त करण्याची काही प्रकरणे उजेडात आली आहे. यावरून कारंजा परिसरातून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येते. - 

टॅग्स :Crimeगुन्हा