शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पोहा येथे अतिसार नियंत्रणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:25 IST

पोहा: आरोग्य विभाग वाशिमच्यावतीने कारंजा तालुक्यातील पोहा येथे अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे ही मोहिम ९ जून २०१८ पर्यंत चालणार असून, या अंतर्गत ग्रामस्थांना अतिसार नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आशास्वंयसेविका घरोघरी भेटी देऊन रुग्णांना सेवा देणार आहेत.अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

पोहा: आरोग्य विभाग वाशिमच्यावतीने कारंजा तालुक्यातील पोहा येथे अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ही मोहिम ९ जून २०१८ पर्यंत चालणार असून, या अंतर्गत ग्रामस्थांना अतिसार नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. सरपंच डॉ. शरदराव दहातोंडे सरपंच पोहा यांचे या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.अतिसार पंधरवडा मोहिमेंतर्गत अतिसार हा आजार दुषित पाण्यामुळे आजार होत असून, या आजारापासून बचावासाठी निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिणे, शिळे अन्न, सडकी फळे, मेवामिठाई खाऊ नये, अशी माहिती ग्रामस्थांना सरपंच डॉ. शरदराव दहातोंडे यांनी दिली, तसेच उपचारापेक्षा प्रतिबंध केंव्हाही बरा, वैयक्तिक व परिसर स्वच्छता परिसर  ठेवणे प्रय्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत आशास्वंयसेविका घरोघरी भेटी देऊन रुग्णांना सेवा देणार आहेत. आरोग्य सेविका एम.एम. बुधनेर यांनी यावेळी अतिसाराच्या गंभीरतेबाबत माहिती देताना सांगितले की, देशात ५ वर्षापर्यतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, १० टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. कविता भास्करराव दहातोंडे म्हणाल्या की, या मोहिमेंंतर्गत आशासेविका गृहभेटी देऊन सर्वेक्षण करणार असून, क्षारसंजीवनी पाकिटाचे वाटप या अंतर्गत करण्यास गटसभा घेऊन ओआरएस द्रावण तयार करणे, हातधुण्याच्या पद्धती, आजाराची लक्षणे दिसलेल्या बालकास ओआरएस व झींक गोळ्या देऊन ऊपचार करणे, धोक्याच्या लक्षणाची गंभीरता वेळीच ओळखून संदर्भ सेवा देणे, आदि कार्य त्यांच्यावतीने करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला आशासेविका शिला दहातोंडे, योगिता जाधव व गावातील महिला, पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सेवक ए.जी.सोनोने यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम