------------------
येवता प्रकल्पात केवळ ५० टक्के साठा
उंबर्डाबाजार : गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्यामुळे उंबर्डाबाजार परिसरातील प्रकल्प काठोकाठ भरले होते, परंतु वाढलेले तापमान आणि सिंचनासाठी होत असलेल्या उपशामुळे जलसाठ्यात मोठी घट येत आहे. त्यात येवता येथील प्रकल्पात आता केवळ ५० टक्के उपयुक्त साठा उरला आहे.
---------------
मूकबधिर विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी
अनसिंग: येथील निवासी मूकबधिर विद्यालयात २० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किर्ती चंद्रकांत देवळे, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक खवले उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक बारगळ यांनी, तर आभार प्रदर्शन काळबांडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक एन. एस. कोल्हे यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.