वाशिम : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत तीनही उपविभाग स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून याव्दारे स्वत: पालकमंत्री संजय राठोड उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी सोडविणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी झालेल्या जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले. महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समाधान शिबिरामध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या शिबिरांतर्गत प्रत्येक तहसीलदार कार्यालयात तक्रारी स्वीकारण्यात येतील. याकरिता निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानुसार, नागरिकांचे तक्रार अर्ज स्वीकारून ते संबंधित यंत्रणेकडे पाठविण्याचे काम तहसील स्तरावरून होणार आहे. तसेच संबंधित विभागांनी विहित कालावधीत अर्जावर उत्तर सादर करणे बंधनकारक असल्याचे कळविण्यात आले आहे.
पालकमंत्री सोडविणार नागरिकांच्या अडचणी!
By admin | Updated: April 14, 2017 13:42 IST