शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीसह कोरोना सद्य:स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, ...

यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी मान्सूनपूर्व तयारी व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्य:स्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, लहान मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र वाॅर्डची माहिती आदी बाबींचा आढावा घेतला.

पालकमंत्री देसाई म्हणाले, मान्सून काळात ग्रामीण भागातील काही रस्त्यांवरील पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीतही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. या अनुषंगाने विशेष खबरदारी घ्यावी व अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. धोकादायक इमारतींमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणने त्वरित कार्यवाही करून सदर वीजपुरवठा पूर्ववत करावा. तलाव, बंधाऱ्यातील पाणी शेतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंत, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधकविषयी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

०००

अन्नधान्य, औषधसाठा उपलब्ध ठेवणार

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्हा प्रशासनाने केलेली मान्सूनपूर्व तयारी व कोरोना सद्य:स्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पूरस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील ५ गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये तीन महिन्यांसाठी लागणारे अन्नधान्य व पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येईल. तसेच पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. मान्सून कालावधीत पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा, शुध्द पाणीपुरवठा याविषयी उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे सुमारे ४४ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.