शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सामुहिक विवाह सोहळय़ाचे प्रस्ताव त्रुटीअभावी प्रलंबित

By admin | Updated: August 6, 2016 02:09 IST

पश्‍चिम व-हाडातील स्थिती; सहभागी लाभार्थी अनुदानापासून वंचित

वाशिम: अमरावती विभागातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांत मिळून मागील चार वर्षांतील सामुहिक विवाह सोहळय़ांचे १ हजार ६00 च्यावर प्रस्ताव त्रुटीअभावी प्रलंबित आहेत. या संदर्भात तिन्ही जिल्ह्यांच्या समाज कल्याण कार्यालयाकडून संबंधित स्वयंसेवी संस्थांकडे दुरुस्तीचे पत्र सादर केले असले तरी, अद्यापही अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याची दुरुस्ती करून सुधारीत प्रस्ताव पाठविले नाहीत. समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, आणि भटक्या विमुक्त जातींमधील उपवर मुलामुलींच्या विवाह सोहळय़ांसाठी प्रति जोडपे १0 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते, तसेच या सोहळय़ांचे आयोजन करणार्‍या स्वयंसेवी अथवा सामाजिक संस्थांनाही प्रोत्साहनपर प्रती जोडपे २ हजार रुपयांचे अनुदान समाज कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येते. या योजने अंतर्गत बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात मागील चार वर्षांत अर्थात २0१२ पासून तीन हजाराच्यावर सामुहिक विवाह सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले. मात्र, त्यातील १ हजार सहाशेहून अधिक प्रस्ताव त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ७४६, तर बुलडाणा जिल्ह्यातील ५१९ विवाह सोहळय़ांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. विवाह सोहळय़ाचे आयोजन करताना समाविष्ट जोडप्यांचे प्रथम विवाहाचे दाखले न देणे, जोडप्यांचे आधार कार्ड अथवा ओळखपत्र सादर न करणे आणि बँकेचा खाते क्रमांक सादर न करणे आदी कारणांमुळे हे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे संबंधित कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडून कळले. आता या संस्थांनी सुधारीत प्रस्तावच शासनाकडे पाठविले नसल्याने त्यांनी आयोजित केलेल्या विवाह सोहळय़ात सहभागी झालेली सर्व जोडपी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, यावर्षी सन २0१६-१७ साठी अमरावती विभागात अनुसूचित जातीच्या सामुहिक विवाह सोहळय़ांसाठी ४१ लाख २२ हजार रुपयांचा, तर भटक्या विमुक्त जातीच्या विवाह सोहळय़ांसाठी ३ लाख २२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.