शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे वाढली भुजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:04 IST

भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस आलेल्या पावसामुळे भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढली आहे. त्यात आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे भुजल पातळीला अधिकच आधार झाला असून , यंदा पाणी समस्येची तीव्रता कमी होण्यासह सिंचनाची समस्याही मिटल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस पडतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र, पावसाची अनियमितता वाढल्याने पावसाची सरासरी कमी होऊन त्याचा भुजल पातळीवर भीषण परिणाम झाला आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे करून तयार केलेल्या अहवालावरूनच हे स्पष्ट होते. या संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गत पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्याच्या अखेरची भुजल पातळी ही २.६१ मीटर असून, यंदाची अर्थात आॅक्टोबर २०१९ ची भुजल पातळी ही १.४२ मिटर असल्याचे दिसून आले. अर्थात यामुळेच जिल्ह्यातील भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.गतवर्षी अपुऱ्या पावसानंतर जिल्ह्यात सिंचनासाठी वारेमाप उपसा झाल्याने भुजल पातळी जवळपास सव्वा मिटरने खालावली होती. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर संपेपर्यंतही पावसाची सरासरी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे यंदा भुजल पातळीची स्थिती चिंताजनक होती. तथापि, सप्टेंबरच्या अखेरनंतर परतीचा पाऊस चांगला कोसळला, तर आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडल्याने भुजल पातळीला मोठा आधार मिळाला असून, आॅक्टोबर महिन्यातच भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढ झाल्याचे आढळून आले. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे सोपे होणार आहे. तथापि, पावसानंतर तात्काळ झालेल्या सर्वेक्षणातील ही वाढ असून, डिसेंबरनंतरही पातळी कमी होणार आहे. डिसेंबरनंतर करण्यात येणाºया सर्वेक्षणातील भुजल पातळीवरूनच जिल्ह्यातील भुजल पातळीची तीव्रता स्पष्ट होणार आहे. मंगरुळपीरमधील स्थिती सर्वात उत्तमजिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर कोसळलेल्या पावसामुळेच भुजल पातळीला मोठा आधार झाला असला तरी, त्यात सर्वाधिक वाढ ही कारंजा तालुक्यात दिसून येत आहे. या तालुक्यात ११ सर्वेक्षण विहिरींच्या तपासणीनुसार गत पाच वर्षांतील भुजल पातळी ३.४० असताना यंदाची भुजल पातळी ही १.६७ मीटर अर्थात गत पाच वर्षाच्या सरासरीच्या दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले. या सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात भुजल पातळीत १.७३ मीटरने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्याची भुजल पातळी १.३० मीटरने वाढली आहे. मानोरा तालुक्यात मात्र यंदाची भुजल पातळी १.९२ मीटर असतानाही गत पाच वर्षाच्या तुलनेत या तालुक्यातील भुजल पातळी केवळ ०.९८ मीटरने वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिम