शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चार जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 11:45 IST

Washim News चालू आर्थिक वर्षातील चार जोडप्यांना अनुदान मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात गत तीन वर्षांत केवळ ५४ प्रस्ताव आले असून, यापैकी चालू आर्थिक वर्षातील चार जोडप्यांना अनुदान मिळाले नाही.सामाजिक समतेचा संदेश, जाती-जातींमधील विषमतेची दरी कमी करणे, आंतरजातीय विवाहास होणारा विरोध कमी करणे यांसह आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास प्रोत्साहन म्हणून शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जाते. समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना  राबविण्यात येत असून, याअंतर्गत पात्र जोडप्याला ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या जोडप्यास या योजनेचा लाभ दिला जातो.  आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात येते. जिल्ह्यात या योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडे कमी संख्येने प्रस्ताव  प्राप्त होत असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये सन २०१८ मधील २८ आणि २०१९ मधील २२ प्रस्तावांचा समावेश आहे. सन २०१८ व २०१९ मधील अनुदान संबंधित जोडप्यांना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात जवळपास चार प्रस्ताव आले असून, याचे अनुदान बाकी आहे.  

अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर अनुदानाचा लाभ दिला जातो. अनुदानासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. - माया केदार, जिल्हा समाकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना