वाशिम :जिल्हयात ४९३ ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवकांची सरळसेवेव्दारे भरतीची ३0३ पदे मंजूर आहेत तसेच ग्रामविकास अधिकार्यांची सरळ सेवेव्दारे भरती करावयाची १४ व पदोन्नतीव्दारे भरती करावयाची ४१ अशी एकूण ५५ पदे मंजूर आहेत अशाप्रकारे ४९३ ग्रामपंचायतीसाठी केवळ ३५८ ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकार्यांची पदे मंजूर आहेत. ग्रामसेवकांच्या मंजूर सरळ सेवेव्दारे भरती करावयाच्या ३0३ पदापैकी प्रत्यक्षात ग्रामसेवकांच्या सरळसेवेव्दारे २९२ पदांचाची भरती करण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास अधिकार्यांच्या सरळसेवेव्दारे भ्ज्ञरती करावयाच्या मंजूर १४ पदापैकी फक्त चार पदांचीच भरती करण्यात आली आहे.
ग्रामसेवकांचे पदे रिक्त
By admin | Updated: October 22, 2014 00:37 IST