शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लेखा परीक्षणास ग्रामपंचायतींचा ‘खो’!

By admin | Updated: January 6, 2017 02:24 IST

शासकीय निर्देशाची पायमल्ली; ४९१ पैकी एकाही ग्रामपंचायतीने सादर केले नाहीत लेखे.

सुनील काकडे वाशिम, दि. ५- १४ व्या वित्त आयोगांतर्गत १0 टक्के 'परफॉर्मन्स ग्रॅन्ट' मिळवायची असेल तर दोन वर्षाआतील कालावधीचे लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे; मात्र शासनाच्या या निर्देशाची पायमल्ली करीत जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने अद्याप लेखा परीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर केला नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा १00 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींकडे सुपूर्द करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. सोबतच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस धोरणदेखील आखण्यात आले आहे. त्यानुसार, ग्रामविकास विभागाने राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून १४ व्या वित्त आयोगांतर्गत देय ९0 टक्के निधी कुठल्याही अटीविना देण्याचा निर्णय घेतला; मात्र उर्वरित १0 टक्के निधी ह्यपरफॉर्मन्स ग्रॅन्टह्ण म्हणून दिला जाणार असून, त्यासाठी ग्रामपंचायतींना गत दोन वर्षाच्या आतील कालावधीचे लेखा परीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय कुठल्याच ग्रामपंचायतीला ह्यपरफॉर्मन्स ग्रॅन्टह्ण मिळणार नाही. यासह गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात वाढ होणेदेखील अपेक्षित आहे. त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. असे असले तरी १0 महिन्यांचा मोठा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील ४९१ पैकी एकाही ग्रामपंचायतीने अद्याप लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर केलेला नाही. परिणामी, १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणार्‍या परफॉर्मन्स ग्रॅन्टपासून जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती मुकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.