शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत क्षेत्रात उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची पूर्वतयारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:31 IST

वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्राम पंचायतीबरोबरच ग्रामपंचायतचे प्रभाग आणि जिल्हा परिषद गणातदेखील स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामपंचायतींना उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्राम पंचायतीबरोबरच ग्रामपंचायतचे प्रभाग आणि जिल्हा परिषद गणातदेखील स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामपंचायतींना उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करण्याचा कालावधी असून, १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ग्रामिण भागातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ या वर्षापासून ग्राम पंचायतमधील वार्ड, प्रभाग आणि जि.प. गणाला सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या अभियानांतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय पुरस्कार सुधारित शासन निर्णयानुसार बंद करण्यात आला आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कार पुर्वीप्रमाणेचे आहेत. जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, दुसरा पुरस्कार तीन लाख रुपये आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयांचा आहे.सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामपंचायतींना उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करावी लागणार आहे. यानंतर १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान