शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची लागणार कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:41 IST

वाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २७३ ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान होणार ७ आॅक्टोबरलायंदा प्रथमच होणार थेट जनतेतून सरपंचाची निवडदिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालिम असून, सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत पोहोचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही आपली शक्ती दाखविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाने व्यूहरचना आखली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी तसेच भाजपा समर्थित कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विविध आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भाजपा नेत्यांचे कसब पणाला लागणार आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांच्यासह भाजपा पदाधिकाºयांना त्या दृष्टिने नियोजन करावे लागणार आहे. शिवसैनिक तथा समर्थकांच्या हाती अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता सोपविण्यासाठी  पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांना विशेष कसरत करावी लागणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिक तथा समर्थकांना बसणार नाही, याची दक्षता शिवसेनेच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील सत्ता टिकविण्याबरोबरच जनाधार वाढविण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता आपल्या समर्थकांच्या हाती सोपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील मैदानात उतरावे लागणार आहे. त्या दृष्टिने माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांच्यासह राकाँ नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत घवघवीत यश मिळविणाºया भारिप-बमसंलादेखील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समर्थक व कार्यकर्त्यांना विविध आघाडीच्या माध्यमातून अधिकाधिक ग्रामपंचायतींच्या सत्तेत बसविण्यासाठी जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांना फिल्डिंग लावावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील ‘राजकारण’ ढवळून निघत असून पक्षाच्या नेत्यांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपणार असून, ग्रामपंचायत निवडणुक ही रंगीत तालिम ठरत आहे. दरम्यान, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली असून, २२ सप्टेंबर अंतिम मुदत आहे. १६ सप्टेंबरपर्यंत सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.