शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत लागणार जि.प. पदाधिकाऱ्यांचा कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:39 IST

Gram Panchayat Election : राजकीय पत कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.जवळपास १९ ग्रामपंचायतींमध्ये अतितटीच्या लढती आहेत.

- संतोष वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  ग्रामीण भागात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापतींचा कस लागणार असून, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, ग्रामीण भागात राजकारण शिगेला पोहोचले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. आता ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्याने आपल्या पॅनलला, समर्थकांना निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार विषय समिती सभापतींच्या गटातील जवळपास १९ ग्रामपंचायतींमध्ये अतितटीच्या लढती असून, यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील सहा पंचायत समितींचे सभापती, उपसभापतींनादेखील आपली राजकीय पत कायम ठेवण्यासाठी पं. स. गणातील ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

एक नजर जि.प. पदाधिकाऱ्यांच्या गटातील ग्रामपंचायतींवर  

जिल्हा परिषद अध्यक्षांचा आसेगाव गट या गटाचे सदस्य चंद्रकांत ठाकरे हे ३२७८ मताधिक्क्याने निवडून आले होते. ते सध्या जि.प. अध्यक्ष असून, या गटातील नांदखेडा, फाळेगाव, सार्सी बो., चिंचखेडा या ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी तसेच समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. यामध्ये कोण बाजी मारते? याकडे लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा शिरपूर गटया गटाचे सदस्य डॉ. शाम गाभणे यांनी ३७३ मताधिक्क्याने विजय मिळविला होता. ते सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून, त्यांच्या गटातील एकमेव शिरपूर ग्राम पंचायतची निवडणूक होत आहे. शिरपूर ग्रामपंचायत ही विरोधी गटाच्या ताब्यात होती. सप्टेंबर महिन्यात येथे प्रशासकाची नियुक्ती झाली. शिरपूर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी डॉ. गाभणे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

समाजकल्याण सभापतींचा उंबर्डा गट या गटाच्या सदस्य वनिता सिद्धार्थ देवरे यांनी १८३ मताने विजय मिळविला होता. त्या सध्या समाजकल्याण सभापती असून, या गटातील उंबडार्बाजार, दुधोरा या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांना राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे.

बांधकाम सभापतींचा काटा जि.प. गट या गटाचे सदस्य विजय खानझोडे हे १०९७ मताधिक्क्याने निवडून आले होते. ते सध्या अर्थ व बांधकाम सभापती असून, या गटातील काटा, कोंडाळा झामरे, किनखेडा, तोरनाळा, भोयता या ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांना राजकीय कसब पणाला लावावे लागतील.

शिक्षण सभापतींचा तोंडगाव जि. प. गट या गटाचे सदस्य चक्रधर गोटे यांनी १३२ मते जास्त घेत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली होती. ते सध्या आरोग्य व शिक्षण सभापती असून, या गटातील तोंडगाव व टो या देन ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. तोंडगाव ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची समजली जाते. ही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी त्यांच्या राजकीय मुत्सुद्देगिरीचा कस लागणार आहे. 

बालकल्याण सभापतींचा तळप गट या गटाच्या सदस्या शोभा सुरेश गावंडे यांनी ७८४ मताधिक्क्याने विजय मिळविला होता. त्या सध्या महिला व बालकल्याण सभापती असून, या गटातील तळप बु., कारखेडा, गादेगाव, वरोली, सेवादासनगर या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwashimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद