शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:58 IST

Gram panchyat News ३४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आहे.

रिसोड : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आला असून, या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. मोर्चेबांधणी वेगात असल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते.रिसोड तालुका हा राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत असतो. तालुक्यातील ३४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आहे. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केली होती. गत आठवड्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीयदृष्ट्या रिसोड तालुक्यातील निवडणुका या नेहमीच लक्षवेधी ठरतात. ग्रामपंचायत निवडणुकादेखील प्रतिष्ठेच्या मानल्या जात असल्याने तालुक्यात सध्या मोर्चेबांधणीने चांगलाच वेग धरल्याचे दिसून येते. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही महाविकास आघाडीने एकत्र लढविली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवतील, स्वतंत्र की स्थानिक पातळीवर आघाडी, पॅनल करून लढविली जाईल याबाबत तुर्तास काही निश्चित नाही. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सत्ताधाºयांसह विरोधकांनी मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते.

 या आहेत ३४ ग्रामपंचायतीरिसोड तालुक्यातील लोणी बु., करंजी, खडकी सदार, हराळ, केशवनगर, रिठद, चिचांबापेन, गोभणी, कंकरवाडी, केनवड, मसला पेन, व्याड, वाकद, वनोजा, आगरवाडी, चिंचाबाभर, देऊळगाव बंडा, नावली, नेतन्सा, पळसखेड, सवड, येवती, नंधाना, मांगुळ झनक, कवठा खु., चिखली, गोवर्धन, शेलू खडसे, करडा, बिबखेडा, मोठेगाव, गौंढाळा, एकलासपूर, मोप या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक