शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र सचिवाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आक्रमक

By admin | Updated: May 27, 2017 19:43 IST

२५ मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना निवेदन दिले.

रिसोड: तालुक्यातील नंधाना येथील ग्रामसचिव विनोद विर यांची तात्काळ बदली करुन नंधाना ग्रामपंचायतीला स्वतंत्र सचिव देण्याची मागणी  सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी २५ मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याची दखल न घेतल्यास १ जुन २०१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करुन कामकाज बंद करण्याचा इशाराही दिला आहे. रिसोड  पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नंधाना या गावासाठी कार्यरत ग्रामसेवक गावात नियमित येत नाहीत. सर्वसामान्य माणसाला दाखल्यावर सही आणण्यासाठी रिसोड येथेच जावे लागते. अनेक कामासाठी सचिवाची सही घेण्यासाठी रिसोडलाच जावे लागते. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी  अनेक वेळा सचिवांना गावात प्रत्येक आठवड्यात एक दिवस येण्याची विनंती केली. परंतु त्याचा फायदा झाला नाही. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, दरम्यान, ग्रामससचिव असूनही, जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्यांमध्ये रोेषाचे वातावरण असून, या संदर्भात संबंधितांना माहिती देऊनही काहीच फायदा होत नसल्याने त्यांनी रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून आपल्या समस्या त्यामध्ये मांडल्या आहेत. त्या समस्यांचा विचार  करून नंधाना येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांची बदली करण्यासह येथे स्वतंत्र ग्रामसेवक देण्याची मागणी त्या निवेदनातून करण्यात आल आहे.  याची दखल घेतली नाही, तर येत्या  १ जून रोजी  सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही  देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रति ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत. निवेदन देतवेळी सरपंच सुधाकर बोरकर, उपसरपंच गजानन पवार, ग्रा.पं. सदस्य गजानन बोरकर, काशीराम उबाळे, सविता बोरकर, सरलाबाई चव्हाण,  संगिता बोरकर, रंजना उबाळे, रेखा उबाळे यांच्यासह गावातील पुरुष आदि उपस्थिती होते.