अकोला, दि. ५- अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदार नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत (शनिवारी) अमरावती विभागात प्राथमिक माहितीनुसार १ लाख ५५ हजार १२४ पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ातील पदवीधर मतदारांचा समावेश आहे.अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पाचही जिल्हय़ात राबविण्यात आली. पदवीधर मतदार नोंदणीत प्रत्येक जिल्हय़ात पदवीधर मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील तालुक्यातील पदवीधर मतदारांचे अर्ज संबंधित तहसील कार्यालय, महानगरपालिका क्षेत्रातील पदवीधर मतदारांचे अर्ज पाच झोनस्तरावर आणि कर्मचारी पदवीधर मतदारांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत स्वीकारण्यात आले. पदवीधर मतदारांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत शनिवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत होती. मतदार नोंदणीमध्ये अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असल्याने, शनिवारी अर्ज सादर करण्यासाठी पदवीधर मतदारांची संबंधित कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. पदवीधर मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत प्राथमिक माहितीनुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात १ लाख ५५ हजार २१४ पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. पदवीधर मतदार नोंदणीत पदवीधर मतदारांचे प्राप्त अर्ज आणि करण्यात आलेल्या मतदार नोंदणीचे विभागातील सविस्तर चित्र रविवारी स्पष्ट होणार आहे.पाच जिल्हय़ातील अशी आहे मतदार नोंदणी!जिल्हा मतदारांचे प्राप्त अर्ज अकोला २९५९४ अमरावती ५५00६बुलडाणा ३४७६३वाशिम १८६२६यवतमाळ १७१४८वि.आयुक्त कार्यालय ७७.........................एकूण १५५२१४
अमरावती विभागात दीड लाखांवर पदवीधर मतदारांची नोंदणी
By admin | Updated: November 6, 2016 02:02 IST