शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

चोरट्यांकडून हजारोंचा माल हस्तगत

By admin | Updated: November 9, 2014 01:09 IST

कारंजा पोलिसांची कामगिरी.

कारंजा लाड (वाशिम) : वाहनांच्या बॅटर्‍या व तांब्याची तार चोरणार्‍या ४ जणांना कारंजा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ८ नोव्हेंबर रोजी ३४ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगलवारा परिसरातील अ. सलीम अ. मजीद (३0), बरकतशहा सैफुल्लाशहा (२३), रिजवान ऊर्फ राजा सुल्तान खान (२0) व अ. जमील अ. मज्जीद (२५) यांना ४ नोव्हेंबर रोजी वाहनांच्या बॅटर्‍या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना न्यायालयासमक्ष उभे केले असता त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या कोठडीदरम्यान पोलिसांना आरोपींकडून माल हस्तगत करता आला नाही. त्यानंतर सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली; परंतु कारंजा पोलिसांच्या विनंतीवरून न्यायालयाच्या आदेशाने सर्व आरोपींना पुन्हा ७ ते ९ नोव्हेंबरपर्र्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपासाअंती पोलिसांनी आरोपीकडून २0 हजार रुपये किमतीच्या २४ नग सेल बॅटर्‍या, ८ हजार रुपये किमतीची २0 किलो तांब्याची तार व ५ हजार ५00 रुपयांची पीकअप वाहनाची बॅटरी असा ३३ हजार ५00 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास देशमुख व ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा पोलिस करीत आहे.