शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांना कापसाची प्रतिक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:45 IST

वाशिम: जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी, भावातील फरकामुळे शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडेच असल्याने जिल्ह्यातील तीनपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही. 

ठळक मुद्देभावातील फरकामुळे शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडेवाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र २५ आॅक्टोबरपासून सुरू केले आहेत. शासनाने प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव जाहीर केले तर व्यापाऱ्यांकडून ४७०० रुपयांपेक्षा अधिक भाव दिले जात आहेत.

 

वाशिम: जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी, भावातील फरकामुळे  शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडेच असल्याने जिल्ह्यातील तीनपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही. 

शासनाने सीसीआयकरीता कापूस पणन महासंघामार्फत कापसाची शासकीय खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र २५ आॅक्टोबरपासून सुरू केले आहेत. मंगरुळपीर, कारंजा आणि मंगरुळपीर या तीन ठिकाणी हे केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रावर कपाशीची खरेदी करण्यासाठी ग्रेडरची नियुक्तीही करण्यात आली. त्याशिवाय खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणीही केली. सुरुवातीच्या ८ ते १० दिवसांत तिन्ही ठिकाणी मिळून ७० पेक्षा अधिक शेतकºयांनी कपाशीच्या विक्रीसाठी नोंदणीही केली; परंतु शासनाने यंदा कपाशीसाठी प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव जाहीर केले तर व्यापाºयांकडून शेतकºयांना ४७०० रुपयांपेक्षा अधिक भाव दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी करणाºया शेतकºयांनीही शासकीय खरेदी केंद्राऐवजी व्यापाºयांनाच पसंती दर्शविली आहे. प्रत्यक्षात व्यापाºयांच्या भावात आणि शासनाच्या हमीभावात केवळ ३५० ते ४०० रुपयांची तफावत आहे. तथापि, शेतकºयांना इतर पर्याय नसल्याने त्यांना व्यापाºयांकडे कापूस विकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यातही वाशिम जिल्ह्याबाहेर ५ हजार रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात कपाशी नेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्याच्या काळातही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप एक क्विंटल कपाशीसुद्धा खरेदी झालेली नाही. कारंजा आणि मानोरा तालुक्यात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. कारंजात कपाशीला चांगला बाजार असला तरी, मानोरा आणि मंगरुळपीरमध्ये कपाशीसाठी योग्य दर मिळू शकणारी खाजगी बाजारपेठच नाही. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील कापूस उत्पादक अकोला, येथे, तर मानोरा तालुक्यातील कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात कपाशीची विक्री करण्यावर भर देत आहेत. परिणामी जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र कापसाविना ओस पडली आहे.