शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

सरकारने देशात अदृष्य आणीबाणी लावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:20 IST

विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. 

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांचे प्रतिपादन राज्यव्यापी दौ-यात सरकारवर कडाडून टिका

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर प्रथमच काढलेल्या राज्यव्यापी दौºयादरम्यान मालेगाव येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत तुपकर यांनी सरकारवर कडाडून टिका केली. यावेळी तुपकर यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष दामूअन्ना पाटील, मराठवाड्याचे गजानन पाटील बंगाळ, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अमोल वाघमारे, टाले आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलताना तुपकर म्हणाले, की विद्यमान सरकारच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाले; पण विकासकामांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळेच आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. सरकारने नोटाबंदीनंतर किती नुकसान झाले, किती नोटा नव्याने छापल्या, याचा हिशेब अद्याप जनतेसमोर सादर केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी असून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकºयांना अद्याप मिळाला नाही. विकासाच्या नावाखाली शेतकºयांची लूट केली जात आहे. याविरोधात कुणी बंड पुकारले तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखविली जात आहे. परंतू आम्ही सरकारला कदापि भिणार नाही, असे तुपकर म्हणाले. शेतकºयांच्या शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक भाव मिळाला पाहिजे, हमी भाव केंद्र ठिकठिकाणी सुरू व्हायला हवे, यासह इतर मागण्यांसाठी नोव्हेंबरच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी जंतरमंतरवर धडक मोर्चा काढला जाणार असून देशभरातील शेतकरी त्यात सहभागी होतील, असा दावा यावेळी तुपकर यांनी केला.