शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीविनाच शासकीय कापूस संकलन केंद्रांनी गुंडाळला गाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:09 IST

कापूस पणन महासंघाचे पाचही कापूस संकलन केंद्र सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर खरेदीविनाच बंद करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कापूस पणन महासंघाच्या अकोला विभागात सीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कापसाची शासकीय खरेदी करण्यासाठी सुरू करण्यात आलेले कापूस पणन महासंघाचे पाचही कापूस संकलन केंद्र सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर खरेदीविनाच बंद करण्यात आले आहेत. बाजारात मिळणारे चांगले दर, या उलट शासनाचे अल्प हमीदर आणि चुकाऱ्याला होत असलेला विलंब आदी कारणांमुळे या केंद्रांवर कापसाची क्विंटलभरही खरेदी होऊ शकली नाही.गतवर्षीच्या हंगामात शासनाकडून लांब धाग्याचा कपाशीला ५,४५० रुपये प्रतिक्विंटल, तर मध्यम धाग्याच्या कपाशीला ५,२५० रुपये प्रतिक्विंटलचे हमीभाव घोषित करण्यात आले होते. या उलट खासगी व्यापाऱ्यांकडून सुरुवातीपासूनच ५,८०० रुपयांहून अधिक भाव कपाशीला देण्यात येत होते. त्यामुळे शेतकºयांचा व्यापाºयांकडे कापूस विकण्यावर भर होता. अशात सीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कापूस पणन महामसंघाची (फेडरेशनची) शासकीय खरेदी केंद्र विविध ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. त्यात अकोला विभागातील अकोला जिल्ह्यात कानशिवणी, तेल्हारा, बाळापूर येथे, तर वाशिम जिल्ह्यात मानोरा आणि कारंजा येथे हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु खासगी बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली. दरम्यान, मार्च महिन्यात खासगी बाजारात कापसाचे दर गडगडून ५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस येण्याची आशा पल्लवित झाली; परंतु ही आशा फोल ठरली आणि नंतर खासगी बाजारात कपाशीचे दर ६ हजारांपर्यंत पोहोचले. त्यामुळे अखेर अकोला विभागातील फेडरेशनची पाचही कापूस संकलन केंद्र खरेदीविनाच बंद करावी लागली.

 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस