शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मृत्यूच्या आकडेवारीत ‘गौडबंगाल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असतानाच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असतानाच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन अहवालानुसार १ ते २३ मार्च या कालावधीत केवळ १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात आले. दुसरीकडे मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी असलेल्या वाशिम नगरपालिकेने कोरोनानेच मृत्यू झालेल्या ३२ जणांवर अंत्यसंस्कार केल्याची नोंद आहे. यावरून कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत मोठे ‘गौडबंगाल’ असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात १ मार्च २०२१ पासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. २८ फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधितांचा ८ हजार ९३४ असलेला हा आकडा २३ मार्चअखेर ४ हजार ४७६ ने वाढून १३ हजार ४१० वर पोहोचला आहे. दुसरीकडे २३ दिवसांतच १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून दैनंदिन मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

प्रत्यक्षात मात्र खोलात जाऊन चौकशी केली असता, चित्र वेगळेच असल्याचे समोर आले. बेवारस मृतदेहांसह कोरोना पॉझिटिव्ह असताना मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी असलेल्या वाशिम नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात १ ते २३ मार्च या कालावधीत ३२ मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आल्याची नोंद आहे. विशेषत: हे सर्व मृतदेह कोरोनाबाधितांचे असून तशा पावत्या न.प.च्या आरोग्य विभागाला जिल्हा रुग्णालय व पल्स क्रिटीकल केअर हॉस्पिटल या खासगी दवाखान्याकडून प्राप्त झालेल्या आहेत. असे असताना जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून १ ते २३ मार्च या कालावधीत प्राप्त अहवालानुसार कोरोना मृतकांची एकूण संख्या १४ असल्याचे दर्शविण्यात आली आहे. यामुळे कोरोना मृतकांच्या खऱ्या आकडेवारीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

.......................

‘पल्स क्रिटीकल’मधील चार मृत्यूंची नोंदच नाही

वाशिम शहरात नव्याने सुरू झालेल्या पल्स क्रिटीकल केअर हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आहे. दरम्यान, या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. ५, ७, १० आणि २१ मार्चला हे मृत्यू झालेले आहेत. असे असताना त्याची अधिकृत नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे अद्याप झालेली नाही. मात्र, नगरपरिषद आराेग्य विभागामध्ये यांची नाेंद करण्यात आली आहे.

.................

जिल्हा रुग्णालय सापडले गोंधळात

वाशिम नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने १ ते २३ मार्च या कालावधीत जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त २८ आणि ‘पल्स क्रिटीकल’कडून प्राप्त ४ अशा एकूण ३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची नोंद आहे. हे सर्व मृत्यू कोरोनाबाधितांचे असल्याची माहिती तेथील सूत्रांनी दिली. त्यावरून जिल्हा रुग्णालयास भेट देऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोग्य प्रशासन पुरते गोंधळात सापडले. अधिकृत आकडेवारी काही मिळाली नाही.

......................

कोट :

वाशिम नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून १ ते २३ मार्च या कालावधीत जिल्हा रुग्णालय व पल्स क्रिटीकल केअर या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलकडून प्राप्त एकूण ३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हे सर्व मृत्यू कोरोनाने झाल्याच्या पावत्या संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.

- गजानन गोरे, प्रभारी आरोग्य निरीक्षक, न.प., वाशिम

.........................

कोट :

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या इतरही आजारांमधील बेवारस मृतदेहांची नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विल्हेवाट लावण्यात येते. १ ते २३ मार्च या कालावधीत केवळ कोरोना पॉझिटिव्ह असलेले मृतदेहच नव्हे; तर अन्य बेवारस मृतदेह व कोरोना संशयित मृतदेहांचाही समावेश असू शकतो. याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल.

- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम