शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२.६५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट!

By admin | Updated: May 14, 2017 02:25 IST

प्रशासकीय यंत्रणा खड्डे खोदण्याच्या कामात व्यस्त

सुनील काकडे वाशिम : शासनाने हाती घेतलेल्या ५0 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्हय़ात २.६५ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून खड्डे खोदण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून, किमान दोन फूट उंचीची झाडे उपलब्ध करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरणाने धडपड चालविली आहे.गतवर्षी ह्यएकच लक्ष्य-दोन कोटी वृक्षह्ण, या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्हाभरात २.२२ वृक्षांची जिल्ह्यात लागवड करण्यात आली होती. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा उपक्रम पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार शासनाने केला असून, आगामी तीन वर्षांत देशात किमान ५0 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यानुसार, १५ मे ते ७ जुलै असे जवळपास २२ दिवस वृक्ष लागवडीच्या कामाकडे विशेष लक्ष देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आतापासूनच सुरू झाली असून, प्रशासकीय यंत्रणांना विभागून दिलेल्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टानुसार ३१ मे पूर्वी खड्डे खोदून तयार ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. यावर्षी २.६५ लाख वृक्षांची जिल्हाभरात लागवड केली जाणार असून, त्यासाठी विविध प्रजातींचे किमान दोन फूट उंचीचे वृक्ष तयार ठेवावेत, असे निर्देश वन विभाग, सामाजिक वनीकरणालाही देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.२१ रोपवाटिकांमधून वृक्ष होणार उपलब्ध!जिल्ह्यात वन विभागाच्या अखत्यारित १४ आणि सामाजिक वनीकरणकडे ७, अशा एकूण २१ रोपवाटिका आहेत. १५ जूनपासून सुरू होणार्‍या वृक्षलागवड मोहिमेकरिता या रोपवाटिकांमधून वृक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानुसार, विभागनिहाय मागणीप्रमाणे किमान दोन फूट उंचीची झाडे तयार ठेवण्याकरिता वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाने तयारी चालविली आहे.विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत यंदा ह्यग्रीन आर्मीह्ण अर्थात हरित सेनेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या नागरिकांची ह्यऑनलाइनह्ण नोंदणीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार, जिल्ह्यात चार हजारांपेक्षा अधिक ह्यग्रीन आर्मीह्ण सदस्य तयार झाले असून, त्यांनाही वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. अतिक्रमित "ई-क्लास" जमिनीवरही वृक्ष लागवडवाशिम : देखभाल-दुरूस्ती व संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणार्‍या ह्यई-क्लासह्ण जमिनींवरही वृक्षारोपण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेने घेतला आहे. या निर्णयामुळे ह्यई-क्लासह्ण जमिनींवरील अतिक्रमण हटण्यासोबतच पर्यावरणाच्या संरक्षणाचा दृष्टिकोनही बहुतांशी साध्य होणार आहे. सध्या अतिक्रमित जमिनींवर कुठलेच पीक नसल्याने अतिक्रमकांचेही नुकसान होणार नाही. त्यामुळे अतिक्रमण झालेल्या सर्व जमिनी ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीसाठी ताब्यात घेऊन त्यावर खड्डे खोदून ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.१५ मे ते ७ जुलै यादरम्यान जिल्हाभरात वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जाणार असून, त्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकांमध्ये पुरेशी झाडे उपलब्ध आहेत. या अंतर्गत वन विभागाला १.५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. - एस.आर.नांदुरकरवनपरिक्षेत्राधिकारी, वाशिम