शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

न्याय द्या अन्यथा महाराष्ट्र राज्य सोडण्याची परवानगी द्या, पांगरीवासीयांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 14:34 IST

ज्या राज्यात आमचा जन्म झाला, त्याच राज्यात आमच्यावर अन्याय होत आहे. १४ वर्षांचा वनवास भोगून सुध्दा राज्य सरकार आम्हाला न्याय देवू शकत नसेल तर आम्हाला राज्य सोडून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील नागरिकांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

शेलूबाजार : ज्या राज्यात आमचा जन्म झाला, त्याच राज्यात आमच्यावर अन्याय होत आहे. १४ वर्षांचा वनवास भोगून सुध्दा राज्य सरकार आम्हाला न्याय देवू शकत नसेल तर आम्हाला राज्य सोडून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील नागरिकांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

सन २००३ मध्ये अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेल्या पांगरी येथील नागरिकांची समस्या शासन, प्रशासन  अद्याप सोडवू शकले नाही. पांगरी येथे अद्याप स्वतंत्र ग्रामपंचायत नाही किंवा इतर कोणत्याही ग्रामपंचायतशी या गावाला गट ग्रामपंचायत म्हणून जोडण्यात आले नाही. केवळ रहिवासी दाखला मिळाला म्हणून नजीकच्या तºहाळा ग्रामपंचायतशी जोडण्यात आले आहे. हा अन्याय गत १४ ते १५ वर्षांपासून सहन करणाºया पांगरीवासियांचा आता संयमाचा अंत होत असून, न्याय द्यावा अन्यथा थेट राज्य सोडण्याची परवानगी द्यावी, अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ गावकºयांवर आली आहे. पांगरी येथील नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. सर्वांसाठी घरे अशी घोषणा केंद्र व राज्य शासनाने केलेली आहे. मात्र, शासन दप्तरी कोणत्याही ग्रामपंचायतीला सदर गाव जोडण्यात आले नसल्याने या गावात अद्याप घरकुल योजना पोहोचू शकली नाही. सिंचन विहिरीसाठी मंगरूळपीर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, ग्राम पंचायत अस्तित्वात नसल्याने या प्रस्तावाची साधी दखलही घेण्यात आली नाही. मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ठ असलेल्या या गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व महावितरणाचा कारभार अजूनही अकोला जिल्ह्यातून चालतो, ही शोकांतिका आहे. शैक्षणिक कामासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांना बार्शीटाकळी पंचायत समिती गाठावी लागते. विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा मिळावा किंवा अन्य ग्रामपंचायतशी गट ग्रामपंचायत म्हणून पांगरीला दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. अद्यापही हा प्रस्ताव लालफितशाहीतच अडकलेला आहे. न्याय मिळत नसल्याचे पाहून शेवटी गावकºयांनी टोकाची भूमिका घेत एकतर न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य सोडून  जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.  निवेदनावर विष्णू रामुजी मंजुळकर, ज्ञानदेव राठोड यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.