शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

यंदा सोयाबीनसाठी एक हजार बोनस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:31 IST

शासनाने यंदा सोयाबीनसाठी अतिरिक्त एक हजार रुपये बोनस द्यावा, तसेच जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचया हमीभावातही वाढ करावी, यासाठी वाशिम बाजार समितीच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविले आहे. 

ठळक मुद्देबाजार समितीच्या संचालकांचे पत्र नियोजनपूर्वक नाफेड खरेदीचीही मागणी

वाशिम: यंदा अपुºया पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली असतानाच या शेतमालास बाजारात हमीभावापेक्षा खूपच कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शासनाने यंदा सोयाबीनसाठी अतिरिक्त एक हजार रुपये बोनस द्यावा, तसेच जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचया हमीभावातही वाढ करावी, यासाठी वाशिम बाजार समितीच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविले आहे. 

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना सोयाबीन उत्पादक शेतकºयांची व्यथाच आपल्या पत्रातून कळविली आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की,  यंदा अपुºया पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटलेच शिवाय परतीच्या पावसाने फ टका दिल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यातच शेतकरी रब्बीच्या तयारीसाठी बाजारात सोयाबीन विकण्याची घाई करीत असताना या शेतमालाची हमीभावापेक्षा खूप कमीभावाने खरेदी करण्यात येत आहे. शासनाने नाफेडमार्फत अद्याप सोयाबीनची खरेदी सुरू केली नसल्याने शेतकºयांची बाजारात लुट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालत शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच नाफेडची खरेदी सुरू करण्यापूर्वी साठवणुकीची सोय, बारदाण्याचे नियोजन करावे, प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञ ग्रेडर नियुक्त करावा, जेणेकरून या खरेदीत अडथळे येणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :agricultureशेती