शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजना : अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी आक्षेप मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:34 IST

वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत.

वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास १८ हजार ७३८ नोंदी प्रमाणित झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत स्तरावर ७ डिसेंबरपर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत. शासनाच्यावतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते. जागेअभावी संबंधित लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करावयाचे आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर संगणकीय प्रणालीमध्ये याबाबतच्या नोंदी घेण्यासाठी १५ नोव्हेंबर २०१८ अशी मुदत देण्यात आली होती. संगणकीय प्रणालीवर अतिक्रमणधारकांच्या नोंदीबाबत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाºयांनी त्यांच्या लॉग-इन मधून सदर नोंदी प्रमाणित करणे असा हा कार्यक्रम आहे. जिल्ह्यात जवळपास १८ हजार ७३८ नोंदी प्रमाणित झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठळक, दर्शनी भागात अतिक्रमणधारकांची यादी लावण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत. या याद्यांवर ७ डिसेंबरपर्यंत सूचना, आक्षेप मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी ७ डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात सूचना, आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले. प्राप्त सूचना, हरकतींची पडताळणी झाल्यानंतर संगणकीय प्रणालीवर त्यासंदर्भात नोंदी घेतल्या जाणार आहेत. ७ डिसेंबर २०१८ पर्यंत ग्रामसेवकांनी १ जानेवारी २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल तयार करावा आणि हा अहवाल ग्रामपंचायत दप्तरी ठेवावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना