शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

घरकुल लाभार्थींसाठी तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 16:12 IST

Washim News वाशिम तालुक्यात शनिवारी सुपखेला येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

वाशिम : घरकुल बांधकामविषयक सर्व साहित्य योग्य दरात मिळावे याकरीता जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून बचत गटाच्या मार्फत जिल्ह्यातील सहाही तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट‘ची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. वाशिम तालुक्यात शनिवारी सुपखेला येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.घरकुल बांधकामांना गती देणे, अपूर्ण घरकुल बांधकामे पूर्ण करणे, घरकुलासाठी अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे आदी उद्देशातून महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. घरकुल लाभार्थींना बांधकामविषयक साहित्य योग्य दरात एकाच ठिकाणी मिळावे याकरीता जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून प्रत्येक तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ची सुविधा उपलब्ध केली जात आहे. महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. वाशिम तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद अभियानांतर्गत कार्यरत प्रगती ग्रामसंघ सुपखेला (ता.वाशिम) यांनी कार्यरत केलेल्या घरकुल मार्टचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिनाक्षी पट्टेबहादूर, पंचायत समिती सभापती गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे, गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे, सरपंच विनोद पट्टेबहादूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना