अकोला: नागपुरातील मनीषनगरात एका ऑटोरिक्षा चालकाचा चाकू भोसकून खून केल्या प्रकरणा तील आरोपीस अकोला पोलिसांनी खदान परिसरातून शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. अडीच महिन्यांपूर्वी नागपुरातील हिमांशू प्रमोद भागवत (२२) याने मनीषनगरातील एका ऑटोरिक्षा चालकाचा निर्घृण खून केला. तेव्हापासून तो फरार होता. त्यानंतर हिमांशू याने अकोल्यातील खदान परिसरात येऊन वास्तव्यास सुरुवात केली. अडीच महिन्यांपासून तो अकोल्यात राहत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे हेकाँ राजकुमार मिश्रा, राहुल तायडे, नितीन मगर, श्रीकृष्ण गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी हिमांशू याला खदानमधून अटक केली. शनिवारी आरोपीला नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
नागपूर हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
By admin | Updated: October 10, 2014 23:51 IST