शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

गवळी समाजाने व्यावसायिकतेकडे वळावे!

By admin | Updated: April 30, 2017 02:35 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर; गवळी समाजाचा विभागीय मेळावा उत्साहात.

वाशिम : गवळी समाज हा कष्ट करून उदरनिर्वाह करणारा समाज आहे. प्रगतीच्या यशोशिखरावर जाण्याकरिता समाजाने आता पूर्णत: व्यावसायिकतेकडे वळण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. येथील वाटाणे लॉन्स येथे शनिवार, २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या गवळी समाजाच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले होते. खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, कार्याध्यक्ष हिरामणआप्पा गवळी, महासचिव अशोक मंडले, आमदार अमित झनक, माजी आमदार विजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष कासम नौरंगाबादी, मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. हंसराज अहिर म्हणाले की, गवळी समाज किती अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे, त्याची आपणास जाणीव आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सर्वंकष प्रयत्न केले जातील. शासन स्तरावरून समाजाकरिता विविध योजना पुरविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन व्यवसाय, शिक्षण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामे करुन समाजबांधवांनी स्वविकास साधावा. या माध्यमातून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तत्पूर्वी समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जि.प., पं.स सदस्य तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय सहप्रमुख टिकाराम बरेटीया, संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष अँड. सुभान खेतीवाले, प्रा. सी.पी.शेकुवाले, प्रा. बद्रोद्दिन कामनवाले, रहेमान शेकुवाले, माजी जिल्हाध्यक्ष रहेमान नंदावाले, प्रा.हुसैन शेकुवाले, माजी उपाध्यक्ष महेबूब रेघीवाले, जि.प. सदस्य उस्मान गारवे, अँड. रफिक खाजावाले, मनपा सदस्य इब्राहीम चौधरी, जिल्हा महासचिव लियाकत मुन्नीवाले, कय्युम जट्टावाले, गटनेता फिरोज शेकुवाले, प्रेमचंद अहिर, अलीम रायलीवाले, नगरसेवक राजू जानीवाले, रमजान बेनीवाले, मोहम्मद परसुवाले, बंटी यादव, भोजू रायलीवाले, सलीम मुन्नीवाले, पिरूभाई बेनीवाले, नगरसेवक जुम्मा भगतवाले, सलीम बेनीवाले, सुभान चौधरी, शकील नौरंगाबादी, उस्मान दगीर्वाले यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सी.पी.शेकुवाले यांनी केले. रहेमान शेकुवाले यांनी आभार मानले.