शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अमेरिकेतही थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव

By नंदकिशोर नारे | Updated: September 29, 2023 16:28 IST

अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते.

वाशिम - बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सगळीकडेच धामधूम असते. गणेशोत्सवाचा हा सोहळा देशभरात तर साजरा झालाच, पण अमेरिकेतील मराठी कुटुंबीयांनीही तो मनोभावे साजरा केला. वाशीम जिल्ह्याचे सुपुत्र सुशील दादाराव देशमुख यांच्या पुढाकाराने जॅक्सनविल फ्लोरिडा येथे स्थापन झालेल्या श्रीगणेशाचे विसर्जन भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेतीन वाजता हर्षोल्हासात झाले. 

अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते. यावर्षीसुद्धा दहा दिवस त्यांच्याकडे गणेशोत्सवाची धुमधाम होती. विधिवत स्थापनेनंतर दररोज गणरायाचे विधिवत पूजन, आरती, प्रसाद असे सर्व विधी भारताप्रमाणेच तिथेही केले जातात. यामध्ये सुशील यांच्यासह पत्नी सौ. अर्चना सुशील देशमुख यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांचे लहान भाऊ सुजीत आणि सौ. धनश्री सुजीत देशमुख, शिवबा आणि अबीर ही चिमुकली मुले ही सर्व मंंडळी दहा दिवस तल्लीन होऊन, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये रममाण होतात. घरातील लहानथोर सर्वच जण मोठ्या समर्पणभावाने गणेशोत्सवातील सजावटीची आणि एकूणच सगळी कामे आनंदाने करतात. दररोज दोन्ही वेळा गणरायाची विधिवत पूजा होते. आरती केली जाते. प्रसाद वितरित केला जातो. यासाठीचे  पूजन साहित्य आधीच आणून ठेवलेले असते. गणेशोत्सव काळात देशमुख कुटुंबीयांच्या उत्साहाला उधाण येते. भक्तिभावाने गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. पण त्याची तयारी मात्र आठवडाभर आधीपासूनच सुरू होते.  सुशील आणि सुजीत यांचे वडील दादाराव दिनकरराव देशमुख हे मूळ शिरपूरजैनचे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी नोकरी केली. बदल्यांचा परिणाम मुलाबाळांच्या शिक्षणावर होऊ नये म्हणून ते बुलडाण्यात स्थायिक झाले. त्यांचे थोरले चिरंजीव सुशील यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुणे येथील एका आयटी कंपनीमध्ये रुजू झाले. सुशील यांना चार लहान भावंडे आहेत. स्वतः एमबीए होण्याचे स्वप्न बाजूला ठेवून आपल्या चारही लहान भावंडांना पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांमधून पदवीधर बनवले. त्यांनाही स्वतःच्या पायावर उभे केले. 

आयटीच्या बक्कळ पगाराची ही नोकरी सोडून बारा वर्षांपूर्वी सुशील यांनी आपली स्वतःची कंपनी भारतात आणि अमेरिकेत स्थापन केली. ती लीलया चालवली. आज त्यांच्या या कंपनीने जागतिक मानांक असलेली ग्रेट प्लेस टू वर्क ही उपाधी पटकावली आहे. ग्रामीण भागातील एका मराठी कुटुंबाची ही कामगिरी अभिमानाने ऊर भरून यावा, अशीच आहे. अमेरिकेत स्थायिक होऊन आज या कुटुंबाला बारा वर्षे झाली आहेत. ते जेव्हापासून तिथे स्थायिक झाले, तेव्हापासून दरवर्षी अगदी थाटामाटात श्रीगणेशाची स्थापना करतात. देशमुख कुटुंबातील ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी भारतातीलच नव्हे तर परदेशी भाविकांनीही लाभ घेतला. दररोज आरतीला रेलचेल असायची. आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवून ठेवत घरामागील परसबागेत भाविकांसाठी शामियाना आणि मशालींची सजावट केली होती. त्यांच्यासोबत आजूबाजूचे शेजारीही या गणेशोत्सवात मोलाचा वाटा उचलतात. अमेरिकेतील या महाप्रसादास शंभरावर भाविकांनी हजेरी लावली होती. त्यामुळेच या गणेशोत्सवास घरगुती नव्हे तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप आले होते. शेवटच्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा लाभ अमेरिकेतील शंभरावर भाविकांनी घेतला. 

अमेरिकेत मराठी बाणा जपणारी माणसं

देशमुख कुटुंबीयांच्या सोबतीला रितेश सोरते चंद्रपूर, महेश अतकरे अकोला, सचिन धायडे उदगीर, योगेश साळुंखे लातूर, एस. जोगळेकर मुंबई अशी काही महाराष्टीयन कुटुंब आसपास राहतात. तेसुद्धा या गणेशोत्सवात सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून सुशील देशमुख यांच्या घरामागील परसबागेत बाप्पाचे विसर्जन केले. तसे तर बाप्पाचे विसर्जन जॅक्सनविल बिचवर करायचे होते. मात्र, धो-धो पाऊस असल्याने बाप्पाचे विसर्जन घरच्याघरी कुंडात करावे लागले, अशी माहिती सुशील आणि सुजीत देशमुख यांनी अमेरिकेतून दिली.

टॅग्स :washimवाशिम