शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने गणेश मूर्ती महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:21 IST

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या (पीओपी) गणेश मूर्ती महागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- नंदकिशोर नारेवाशिम - कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या (पीओपी) गणेश मूर्ती महागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात मूर्तिकारांशी संपर्क साधला असता त्यांनीही यास दुजोरा दिला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, शाळांच्यावतीने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात येत असून याकडे नागरिकांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. कच्च्या मालाच्या किमती, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आदी कारणांमुळे गणेशमूर्तीच्या निर्मितीखर्चात यंदा वाढ झाल्याने त्याचा परिणाम मूर्तीच्या दरांवर जाणवणार आहे.

तसेच या कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे अनेक मूर्तिकारांनी यावर्षी मूर्ती तयारच न करण्याचे ठरविल्याने बाजारात दुकाने कमी लागणार. यावेळी मुर्त्या कमी व खरेदीदार जास्त राहतील , यामुळेही मूर्तींचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती (‘प्लास्टर आॅफ पॅरिस’) हे राजस्थानहून आणण्यात येते. गतवर्षी या पीओपीचे भाव १५० रुपयांमध्ये २५ किलो म्हणजेच ६ रुपये किलो. सद्यस्थितीत हेच भाव १९५ रुपयात मिळत आहे म्हणजेच यामध्ये जवळपास दोन रुपये किेलो तसेच बँगवर १०० रुपयाची वाढ दिसून येत आहे. तसेच मूर्तींना देण्यात येत असलेल्या रंगाच्या भावामध्येही मोठया प्रमाणात वाढ झाली असून आधी २१०० रुपयांमध्ये मिळणार रंगाची किंमत ३१०० रुपये झाली. 

पीओपीच्या मूर्ती बनविण्यासाठी साच्यांचा वापर केला जातो. हे साचे सर्वच मूर्तिकार विकत घेऊ शकत नाहीत. हे भाड्याने सुद्धा उपलब्ध होत असल्याने अनेक मूर्तिकार भाड्यानेच घेणे पसंत करतात. परंतु या साच्यांच्या भाड्यामध्येही वाढ झाली असून यावर्षी ३ हजार रुपये दिवसाप्रमाणे मूर्तिकारांना भाडे मोजावे लागत आहे. या खर्चात वाढ झाल्याने मूर्तींच्या दरातही यावर्षी निश्चितच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गणेशमूर्तीसाठी कच्चा माल येतो राजस्थानहूनगणेशमूतीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लास्टर आॅफ पॅरिस, शाडूची माती, रंग यासारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, शाडूची माती, पीओपी आदीच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत  भाव  वधारले आहेत. तसेच रंगाचे भाव वाढले आहेत, असे मूर्तिकार पेंढारकर यांनी सांगितले. या सगळ्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.

शाडुच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळाप्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलचर आणि पर्यावरणावर होणा-या दुष्परिणामावर आळा घालण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीबाबत विविध सामाजिक संघटना, महाविद्यालय, शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करुन शाडूच्या मातीपासून  मूर्तींचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. याचा शेकडो भाविक लाभ घेत असून अनेकांनी मूर्तीही बनवल्या आहेत.

मूर्ती बनवताना लागणा-या साहित्याच्या भावात वाढ झाल्याने यावर्षी भाविकांना मूर्तींचे दर जास्त मोजावे लागणार आहेत. गतवर्षी १०० रुपयांपासून श्रींच्या आकर्षक मूर्ती मिळाल्यात यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ होण्याची चिन्हे आहेत.- राम निरदोडेमूर्तिकार, वाशिम

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८ganpatiगणपती