शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival :  गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:07 IST

वाशीम :  वाशिम : स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बालगणेश मंडळाने गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून, त्याअनुषंगाने अंमलबजावणी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम :  वाशिम : स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बालगणेश मंडळाने गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून, त्याअनुषंगाने अंमलबजावणी सुरू आहे.यावर्षी शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, पर्यावरण, बेटी बचाव, नेत्रदान आदी विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात महिला व बालकांनी पुढाकार घेतला  आहे. महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडपामध्ये प्रत्येकाला आई पाहीजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, मग मुलगी का नाही, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, बेटी है तो कल है, पर्यावरणाचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा, शेतकरी राजा धीर धर, संकटावर मात कर, आत्महत्या करु नको यासोबतच रक्तदान, नेत्रदान बाबत बॅनर लावून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबीर, व्यसनमुक्ती कार्यशाळा, बेटी बचाव कार्यशाळा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, मेळघाट येथील आदिवासी बांधवांना मदत, पर्यावरण जागृती म्हणून १०१ वृक्षांची लागवड, कष्टकरी महिलांचा सत्कार आदी विविध उपक्रमाचे आयोजन या दहा दिवसात करण्यात आले असून दहा दिवस धार्मिक उपक्रम, भजन स्पर्धा, बालकांसाठी चित्रकला स्पर्धा, नृत्यस्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धा, महाप्रसाद आदीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी अ‍ॅड. भारती निलेश सोमाणी, स्मीता दहात्रे, निता दहात्रे,  विमला साबळे, अन्नपूणा बोरकर, मते, खानझोडे, शिवाल, अग्रवाल, लढ्ढा, वनारे, तायडे समवेत मंडळाच्या महिला पदाधिकारी यांनी दिली. मंडळात सर्व महिलांना स्थान देण्यात आले असून युवतींना व बालकांसाठी विशेष प्रबोधन व कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे समन्वयक नीलेश सोमाणी, सुरेश दहात्रे, कैलास दहात्रे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमGanpati Festivalगणेशोत्सव