शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना घातला नोटांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:54 IST

मालेगाव - पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना नोटांचा हार घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी मालेगावात गांधीगिरी आंदोलन केले.

ठळक मुद्देबहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने खरिप हंगामही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.भिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले व पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, १९ जून रोजी संबंधित बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक कुलकर्णी यांना नोटांचा हार घालून गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले. पीककर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा शेतकरी हितार्थ स्वाभिमानी संघटना उद्रेक करेल, असा इशारा इंगोले यांनी दिला.

मालेगाव - पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना नोटांचा हार घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी मालेगावात गांधीगिरी आंदोलन केले. पीककर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडू नका, अन्यथा बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप प्रक्रिया तापदायक ठरत आहे. जिल्हयात १५०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने खरिप हंगामही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पीककर्ज देत असताना विविध स्वरूपातील अटी व शर्थी लादून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. पीककर्ज वाटप प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने बँक प्रशासनाला दिलेले आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाने निर्देश पायदळी तुडवित अद्यापही अनेक बँकांनी पाच टक्केही पीककर्ज वाटप केले नाही. मालेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने पीककर्ज वाटपात प्रचंड दिरंगाई केल्याची माहिती मिळताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले व पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, १९ जून रोजी संबंधित बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक कुलकर्णी यांना नोटांचा हार घालून गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले. पीककर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा शेतकरी हितार्थ स्वाभिमानी संघटना उद्रेक करेल, असा इशारा इंगोले यांनी दिला.

टॅग्स :Malegaonमालेगांवbankबँकagitationआंदोलन