शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या सेवा ज्येष्ठता यादीत गौडबंगाल!

By admin | Updated: October 15, 2016 02:37 IST

अनेक पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित; अधिका-यांच्या मर्जीतील कर्मचारी मात्र वरिष्ठ पदावर विराजमान.

संतोष वानखडे वाशिम, दि. १४- वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून चुकीच्या पद्धतीने सेवा ज्येष्ठता याद्या बनविणे, मर्जीतील कर्मचार्‍यांना पदोन्नती, नियमबाह्य नोकरीत सामावून घेणे आदी प्रकारांनी अमरावती विभागात वाशिमची जिल्हा परिषद प्रकाशझोतात येत आहे. यासंदर्भात आमदार लखन मलिक यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार, वाशिम येथील या सगळ्या प्रकाराची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या समितीमार्फत चौकशी पुर्णत्वाकडे आली आहे.जि.प.सेवा ज्येष्ठता याद्या चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध होत आल्याने अनेक पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले तर अधिकार्‍यांच्या मर्जीतील कर्मचारी वरिष्ठ पदावर आपसुकच विराजमान झाल्याचा प्रकार समोर येत आहे. हातपंप दुरुस्ती पथकातील कर्मचार्‍यांना नोकरीत सामावून घेणे, अधिकार्‍यांची दिशाभूल करून व शासन निर्णयाला डावलून मानिव दिनांक मिळविणे, उच्च न्यायालयाचा निर्णय असतानाही अनुकंपा कर्मचार्‍यांवर कार्यवाही न करणे, पदोन्नतीमध्ये दिव्यांगांचे समांतर आरक्षण असताना आरक्षण दाखवून पदोन्नती करणे, सेवा ज्येष्ठता यादी सुधार समितीचे अहवाल प्राप्त न करताच पदोन्नती करणे, मागासवर्गीय कक्षाचे रोष्टर प्रमाणे पदोन्नती न करणे, काही कर्मचारी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण नसतानाही पदोन्नती देणे आदी अनियमितता यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाकडून झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी केला. यासंदर्भात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी यापूर्वी कर्मचारी उपोषणालाही बसले होते. तथापि, अद्यापही दखल घेतली नाही. यासंदर्भात आमदार लखन मलिक यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे चक्रे फिरली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली; मात्र या समितीतही ठपका असलेल्या काही कर्मचार्‍यांचा वावर असल्याने अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत कलहाची झालरही या सेवा ज्येष्ठता यादीच्या चुकीवर पांघरून घालण्यास पुरेशी ठरत असल्याची चर्चा आहे.सेवा ज्येष्ठता यादी संदर्भातील आक्षेपांची चौकशी पुर्णत्वाकडे आली आहे. लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार आहे.- के.एम. अहमदअतिरिक्त सीईओ, वाशिम