शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या ‘लेटरबॉम्बमुळे’ वाशिम जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:23 IST

Nitin Gadkari's 'letterbomb' : जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात हाच विषय चर्चिला जात आहे.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे पत्र पाठविले. या पत्राने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात हाच विषय चर्चिला जात आहे. यासंदर्भात खा. भावना गवळी यांचे मत जाणून घेतले असता, रस्ते विकास कार्यात अडथळे नव्हे, तर नागरिकांच्या समस्यांना आपण रीतसर, नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून साेडविण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाचे, कंत्राटदारांचे काेणतेही नुकसान हाेणार नाही असे कृत्य शिवसेनेतर्फे करण्यात आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.ना. गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मेडशी ते वाशिमदरम्यान हाेत असलेल्या १२ कि.मी. बायपासचे, मालेगाव ते रिसाेड या राष्ट्रीय महामार्गाचे एक पुलाचे, तर शेलूबाजार रस्त्यावरील काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविल्याचे म्हटले आहे.  यासंदर्भात भावना गवळी यांनी नागरिकांच्या आलेल्या तक्रारी आपण स्वत: नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे म्हटले आहे. रिसाेड परिसरात पडलेले खड्ड्यांमुळे दाेन जणांचा जीव गेल्याने त्या भागातील शिवसैनिक प्रदीप माेरे यांनी आंदाेलन केले व रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले. यावर शिवसैनिक महादेव ठाकरे यांनी जाब विचारला व त्यासंदर्भात माझ्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारी मी स्वत:च नितीन गडकरी यांना पाठविल्या, तसेच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले. मी स्वत: सुरू असलेल्या कामावर जाऊन ना काेणते आंदाेलन केले, ना काेणती ताेडफाेड केली, असेही गवळी यांनी सांगितले. दरम्यान,  धमकीसत्राच्या चाैकशीचे गृहविभागाने पाेलीस महासंचालकांना पत्र पाठवून अहवाल मागविला आहे. यासंदर्भात पाेलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्याशी चर्चा केली असता अद्याप काेणतीही माहिती मागविली नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमNitin Gadkariनितीन गडकरीBhavna Gavliभावना गवळीPoliticsराजकारण