शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वृध्द कलावंतांच्या व्यथांवर मायेची फुंकर

By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST

मानधनात वाढ, सप्टेंबरपासून अंमलबजावणी

वाशिम : मानधन वाढविण्याबाबतच्या व्यथा वृध्द कलावंत गत काही वर्षांपासून शासन दरबारी मांडत आले आहेत. वृध्द साहित्यिक व कलावंतांच्या व्यथांवर शासनाने मायेची फुंकर घातली आहे. अ, ब व क दर्जाचे वृध्द साहित्यिक व कलावंतांना सप्टेंबर २0१४ पासून ५0 टक्के वाढीचे मानधन मिळणार आहे. याचा लाभ राज्यभरातील २३ हजार ३७२ कलावंतांना मिळणार आहे. साहित्य व गीत-गायन, भजन, पोवाड्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करण्याचा विडा अनेक साहित्यिक व कलावंतांनी उचलला आहे. समाजविघातक प्रवृत्ती, समाजातील वाईट प्रथा, बालविवाह, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला अत्याचार आदी बाबींवर साहित्य व भजन, गीतगायन, पोवाड्याच्या माध्यमातून प्रहार करणार्‍या साहित्यिक व कलावंतांना वृद्धापकाळात आर्थिक मदतीचा हात मिळावा म्हणून शासनाने मानधन द्यावे, अशी मागणी राज्यभरातून समोर आली होती. यावर शासनाने वृद्ध कलावंत व साहित्यिकांचे अ, ब व क दर्जा असे प्रकार पाडून मानधन निश्‍चित केले होते. गत पाच वर्षांपासून अ दर्जाच्या वृद्ध कलावंतांना १४00 रुपये, ब दर्जाच्या कलावंतांना १२00 व क दर्जाच्या कलावंतांना १000 रुपये मानधन मिळत होते. महागाईच्या काळात या मानधनात वाढ करण्याची मागणी राज्यभरातील वृद्ध कलावंतांनी शासनाकडे लावून धरली होती. या मागणीची दखल राज्य शासनाने ऑगस्टच्या पंधरवड्यात घेतली असून, त्यानुसार सप्टेंबर २0१४ पासून राज्यभरातील २३ हजार ३७२ कलावंतांना ५0 टक्के वाढीव मानधन मिळणार आहे. या निर्णयामुळे अ दर्जाच्या वृद्ध कलावंतांना २१00 रुपये, ब दर्जाच्या कलावंतांना १८00 रुपये आणि क दर्जाच्या वृद्ध कलावंतांना १५00 रुपये मानधन मिळणार आहे.