शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव; दर्जा घसरल्याने बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 14:12 IST

वाशिम: जिल्ह्यात आॅगस्टच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे डाळिंबाच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देया रोगामुळे डाळिंबाचा दर्जा खालावला असून, फळेही गळून पडत आहेत. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता या फळांची बेभाव विक्री करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात आॅगस्टच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे डाळिंबाच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगामुळे डाळिंबाचा दर्जा खालावला असून, फळेही गळून पडत आहेत. त्यातच दर्जा खालावल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता या फळांची बेभाव विक्री करावी लागत आहे.वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल १२५० हेक्टर क्षेत्रावर हे फळपिक लावण्यात आले असून, या फळाच्या आधारे शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. डाळिंबाचे आंबिया आणि मृग असे दोन बहर असतात. या दोन्ही हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत असतो. या रोगाच्या प्रादुर्भावासाठी अति पाऊस हे एक प्रमुख कारण आहे. त्यातच पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी पूरक असते. जिल्ह्यात १२ आॅगस्टनंतर कोसळलेल्या धो-धो पावसामुळे या हंगामातील डाळिंबाच्या मृग बहारावर या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. अनेक ठिकाणी बुरशीमुळे फळे सुकून गळत आहेत, तर फळांचा दर्जाही मोठ्या प्रमाणात खालावला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बुरशीजन्य रोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून डाळिंब उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात येत असले तरी, हा रोग नियंत्रणापलिकडे गेला आहे. त्यामुळे शेतकºयांकडे डाळिंब तोडून टाकणे हाच पर्याय उरला आहे.

पावसाच्या अतिप्रमाणामुळे डाळिंबावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होतो. सहसा मृग बहारातच या रोगाची लागण होते. शेतकºयांनी वेळीच उपाय करणे त्यासाठी आवश्यक असते. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करून त्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.-दत्तात्रय गावसानेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती