शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या निकषात भर; शेतकरी संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:57 IST

वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यापूर्वीच, त्यात अनेक समस्या उद्भवत आहेत. यापूर्वी दोन वेळा निकष बदलल्यानंतर आता तिसर्‍यांदा जिल्हा प्रशासनाकडे १४ ऑगस्ट रोजी धडकलेल्या पत्रानुसार कर्जमाफीच्या निकषांमध्ये पुन्हा १६ मुद्दे नव्याने समाविष्ट झाले आहेत. यामुळे मात्र शेतकर्‍यांमधील संभ्रम वाढला असून, आतापर्यंत सादर झालेले अनेक अर्ज त्रुट्यांमध्ये अडकून बाद ठरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. 

ठळक मुद्देयापूर्वीचे अर्ज अडकणार त्रुट्यांमध्ये‘ऑनलाइन’ अर्ज प्रक्रियाही वांध्यातकर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकर्‍यांसंबंधी अद्याप निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यापूर्वीच, त्यात अनेक समस्या उद्भवत आहेत. यापूर्वी दोन वेळा निकष बदलल्यानंतर आता तिसर्‍यांदा जिल्हा प्रशासनाकडे १४ ऑगस्ट रोजी धडकलेल्या पत्रानुसार कर्जमाफीच्या निकषांमध्ये पुन्हा १६ मुद्दे नव्याने समाविष्ट झाले आहेत. यामुळे मात्र शेतकर्‍यांमधील संभ्रम वाढला असून, आतापर्यंत सादर झालेले अनेक अर्ज त्रुट्यांमध्ये अडकून बाद ठरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत वाशिम जिल्ह्यातील निव्वळ पीक कर्ज थकीत असलेल्या केवळ ३३ हजार ९३९ शेतकर्‍यांचा समावेश झालेला आहे. त्यातही १४ जूनपासून प्रत्यक्ष ‘ऑनलाइन’ अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असताना १५ ऑगस्टपर्यंत केवळ ३ हजार ७४८ शेतकर्‍यांचेच ‘ऑनलाइन’ अर्ज सादर झाले आहेत. अशातच १४ ऑगस्ट रोजी पुन्हा एकवेळ राज्य शासनाने कर्जमाफीच्या निकषांमध्ये १६ मुद्यांची भर घातली आहे. त्यानुसार, कर्जमाफी लागू होणार्‍या शेतकर्‍याकडे ८४ महिन्यांपूर्वीची जुनी थकबाकी नसावी, संबंधिताने शेती खरेदीसाठी कर्ज घेतलेले नसावे, वेअरहाउस, शीतगृह, माती परीक्षण, रोपवाटिका, ब्रीजप्रक्रिया, अन्नप्रक्रिया आदींसाठी कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार नाही. याशिवाय कृषी कर्ज पुरवठा करणार्‍या पतसंस्था, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मायक्रो फायनान्स, सावकारी, आयटीसी आदींकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही, आदी निकषांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या निकषांपासून अनभिज्ञ असलेल्या शेतकर्‍यांनी केलेला कर्जमाफीचा ‘ऑनलाइन’ अर्जदेखील आपसूकच बाद ठरणार असल्याचे बहुतांशी स्पष्ट झाले आहे. 

कर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकर्‍यांसंबंधी अद्याप निर्णय नाहीपीक कर्ज पुनर्गठन केलेल्या थकबाकीदार शेतकर्‍यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा अध्यादेश शासनाने पारित केला. त्यानुसार, पुनर्गठन झालेल्या जिल्ह्यातील १९ हजार ८९१ शेतकर्‍यांची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने शासनाकडे कळविली आहे. असे असताना संबंधित शेतकर्‍यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत अद्याप एकाही बँकेला लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांमध्ये याप्रती संभ्रम कायमच आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुनर्गठन केलेल्या; परंतु थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना दीड लाख रुपये र्मयादेची कर्जमाफी मिळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कर्ज पुनर्गठन केलेले; परंतु थकबाकीदार असलेले जिल्ह्यातील शेतकरी यासंदर्भात बँकांशी संपर्क साधत आहेत; मात्र वरिष्ठांकडून अद्याप कुठल्याच सूचना नसल्याने तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेतले जात आहेत; मात्र एकाही केंद्रावर कर्जमाफीसंदर्भातील निकषांचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आधी बँकेत जाऊन कर्जमाफी मिळणार किंवा नाही, याबाबत खातरजमा करावी लागत आहे. या प्रक्रियेत त्यांचा वेळ आणि पैशांचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.