शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर; होऊ शकतो कॅन्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

वाशिम : घरात तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरण्याची सवय प्रत्येकालाच असते. महागाईच्या या काळात तसे करणे ...

वाशिम : घरात तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरण्याची सवय प्रत्येकालाच असते. महागाईच्या या काळात तसे करणे चुकीचेदेखील नाही; मात्र हा प्रकार जिवावर बेतू शकतो. खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याने कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारालाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शक्यतोवर तेलाचा पुनर्वापर टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. हाॅटेल्स, टपऱ्यांमध्ये मात्र बिनदिक्कतपणे तेलाचा वारंवार वापर केला जातो. हा कायद्याने गुन्हा असला तरी अन्न प्रशासन विभागाकडून मात्र कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.

स्वयंपाकाचे तेल एकदा वापरले की पुन्हा कधीही वापरू नये, कारण ते खराब व्हायला सुरुवात होते आणि तेलामध्ये ट्रान्स-फॅटी ॲसिडचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषतः थंड तेल पुन्हा गरम करणे टाळायला हवे, कारण त्यात ‘स्मोकिंग पॉईंट्स’ खूप कमी असतात. मोहरीचे तेल, राईस ब्रान ऑइल पुन्हा एकदा वापरता येतात, परंतु तरीही ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.

................

बॉक्स...

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

तळीव पदार्थांसाठी वापर झालेल्या खाद्यतेलात त्यानंतर ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात. त्यामुळे असे तेल दीर्घकाळ वापरणे हानिकारक आहे. फ्री रॅडिकल्स कार्सिनोजेनिक असू शकतात, जे शरीरावर परिणाम करतात. त्यातूनच कोलेस्टेरॉलची समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना घशात जळजळ, हृदयाशी संबंधित आजार यासह एखाद्याप्रसंगी कॅन्सरही होऊ शकतो, असे सिद्ध झालेले आहे.

...............

बॉक्स...

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

भजी, मुगाचे वडे, समोसा, कचोरी, जिलेबी यासह इतरही अनेक प्रकारचे तळीव पदार्थ रस्त्यावर थाटलेल्या टपऱ्यांवर सहज मिळतात. या पदार्थांसाठी खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जातो. नियमानुसार, हा प्रकार हानिकारक आहे. त्यामुळे रस्त्यावरील टपऱ्यांवर तळीव खाद्यपदार्थ खाण्याचा मोह आवरलेलाच बरा, असे जाणकारांचे मत आहे.

...................

कोट :

हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात

मुळात खाद्यतेलाचा अधिक वापर शरीरासाठी हानिकारक आहे. त्यातच तळीव पदार्थ तयार केल्यानंतर त्याच तेलाचा वारंवार वापर करणे अत्यंत घातक ठरू शकते. फ्री रॅडिकल्समुळे कोलेस्टेरॉलची समस्या निर्माण होत असल्याने हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात. नागरिकांनी याबाबत जागरूकता बाळगायला हवी.

- डॉ. प्रवीण ठाकरे, वाशिम

..............

किडनीवरही होऊ शकतो परिणाम

खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याने आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये यामुळे अडथळा निर्माण होऊन कालांतराने त्याचा परिणाम किडनीवरही होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरणारे तेल शक्यतोवर वापरात आणूच नये.

- डॉ. पंकज गोटे, वाशिम

.............

...तर होईल गुन्हा दाखल

नियमानुसार दिवसाला ५० लिटर तेलाचा वापर करणाऱ्या अन्नविक्रेत्यांना तीन वेळाच खाद्यतेलाचा वापर करता येतो. त्यानंतर तेलाची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. ५० लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर करणाऱ्यांनी तेल पुनर्वापर करूच नये; अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.

- नीलेश ताथोड, निरीक्षक, अन्न प्रशासन विभाग

.............

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

खाद्यतेलाचा पुनर्वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अन्न व औषध प्रशासन धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करू शकते. प्रत्यक्षात मात्र या विभागाची भूमिका यासंदर्भात पूर्वीपासूनच उदासीन राहिलेली आहे. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या एकावरही आतापर्यंत कारवाई झालेली नाही.