संतोष वानखडे/वाशिमदुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी यावर्षीपासून वाशिम जिल्हा परिषद ऑनलाइन मोफत प्रवेश प्रक्रिया राबविणार आहे. गतवर्षी मोफत प्रवेश प्रक्रियेला ह्यऑनलाइनह्णची जोड मिळाली नव्हती.शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील उदात्त हेतू आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात जवळपास ७0 नामांकित खासगी शाळा येतात. गतवर्षापासून राज्याच्या शिक्षण विभागाने ह्यआरटीईह्णची प्रक्रिया प्रथमच ह्यऑनलाइनह्ण पद्धतीने राबविली. वाशिम जिल्ह्यात मात्र पहिल्या वर्षी ही प्रक्रिया ऑनलाइन झाली नाही. खासगी शाळेतील मोफत प्रवेशापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून यावर्षीपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सभापती चक्रधर गोटे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. अर्ज कसा भरायचा, नियम काय आहेत, अर्जासोबत काय जोडायचे, याबाबत शिक्षण विभागातर्फे लवकरच जनजागृती केली जाणार आहे. निवासस्थानापासून जवळच असलेल्या नामांकित खासगी शाळेत वंचित घटकातील बालकांचा २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश व्हावा म्हणून यावर्षी आतापासूनच ह्यअँक्शन प्लॅनह्ण आखला असल्याची माहिती गोटे यांनी दिली. खासगी शाळांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे बंधनकारक केले जाणार असून, व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत.मोफत प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई किंवा टाळाटाळ करणार्या संबंधित शैक्षणिक संस्थेविरूद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिला.
शिक्षण विभाग राबविणार मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
By admin | Updated: February 24, 2016 02:17 IST