शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे पिडीतांसाठी मोफत विधी सहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:14 IST

वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने ०७२५२-२३१४५५ ही हेल्पलाईन सुरु केली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाऊन काळात आरोपींना वकील उपलब्ध करून देणे, घरगुती हिंसाचार, भाडेकरूंच्या समस्या सोडवून पीडितांना सहाय्य करण्यासाठी वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने ०७२५२-२३१४५५ ही हेल्पलाईन सुरु केली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी ८ मे रोजी दिली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन संचारबंदीचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरामधील बेघर व समाजातील तळातील वर्ग यापैकी कोणीही उपाशी राहणार नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या अनुषंगाने शासकीय कार्यालयाशी समन्वय साधण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत सुरु आहे. याविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, कर्मचारी, विधी स्वयंसेवक मोतीराम खडसे, बाबाराव घुगे व शाहीर इंगोले हे स्वत: भेटी देवून माहिती घेत आहेत. नागरिकांनी खाण्यापिण्याची व्यवस्था, निवास व्यवस्थाविषयी तक्रारीची माहिती प्राधिकरणास दिल्यास याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील, असे देशपांडे यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात न्यायालयीन कामकाज हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चालत आहे. केवळ अत्यावश्यक व तातडीची प्रकरणे या काळात चालविण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम