शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी चार युवकांची शनिवारवाडा ते आनंदवन ‘सायकलवारी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ) - अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चार ध्येयवेड्या युवकांनी शनिवारवाडा, पुणे ते आनंदवन, ...

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चार ध्येयवेड्या युवकांनी शनिवारवाडा, पुणे ते आनंदवन, वरोरा असा सायकल प्रवास सुरू केला आहे. या सायकलस्वारांचे भर जहॉगीर येथे १५ नोव्हेंबर रोजी सहानुभूती क्लबने स्वागत केले.मृत्यूनंतरच्या अवयवदानाने  इतरांना जीवदान मिळू शकते. अवयदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून किसन ताकतोडे (अहमदनगर), राजेंद्र सोनुवणे (सोलापुर), सुरज कदम (नाशिक) आणि गणेश नरसाळे (सातारा) हे चार युवक गतवर्षापासून दिवाळीदरम्यान पुणे येथील शनिवारवाडा ते आनंदवन वरोरा, असा सायकलद्वारे प्रवास करतात. एरव्ही दिवाळीचा सण म्हटला की सर्वजण कुटुंबात दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देतात. या युवकांनी अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या कामी दिवाळीदरम्यानच्या सुट्ट्या सत्कार्मी लावल्या आहेत. दररोज सायकलद्वारे सुमारे शंभर किलोमिटरचा प्रवास करीत मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे आवाहन ते करीत आहेत. रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर येथे या सायकलस्वारांचे आगमन होताच सहानुभूती फ्रेंन्डस क्लबच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी समाधान सानप, प्रदिप गरकळ, महादेव घुगे, गोपाल थोरात, डॉ.प्रल्हाद कोकाटे, रमेश सरदार, भानुदास गीते, सुभाष जोगदंड, गोपीनाथ मुंढे, प्र्रा.विजय सोनुने, भगवान पुरी, ज्ञानेश्वर तायडे, सचित काळदाते, सिताराम आढाव, अनिल नागरे, रायाजी काळदाते, संतोष महाराज गिरी, महादेव काळदाते, विलास तायडे, रमेश जायभाये, प्रदिप भालेकर, अजय चोपडे, भानुदास कोकाटे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमOrgan donationअवयव दान