लोकमत न्यूज नेटवर्कजउळका रेल्वे : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या किन्हीराजा येथे १८ वर्षीय मुलाने आपल्या चुलत भावाच्या चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना १९ जून रोजी उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणार्या या घटनेप्रकरणी दाखल फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये २0 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडीच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, १९ जून रोजी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास माझ्या मुलीला घरात बोलावून तिला आलू चिप्सचे आमीष दाखवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम ३५४, ३७६ (२) एफ ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरसेवार करीत आहेत. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणार्या या घटनेप्रती किन्हीराजा परिसरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
चार वर्षीय चिमुरडीवर नराधम काकाचा अत्याचार!
By admin | Updated: June 22, 2017 04:20 IST