शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

चार हजारांवर शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:54 IST

वाशिम : शासनाकडून जाहीर झालेल्या पीक कर्जमाफीस पात्र  शेतकर्‍यांनी विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक  करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून वारंवार आवाहन केले  जात आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाचे संकेत बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून जाहीर झालेल्या पीक कर्जमाफीस पात्र  शेतकर्‍यांनी विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक  करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून वारंवार आवाहन केले  जात आहे. मात्र, त्याउपरही सुमारे चार हजार शेतकर्‍यांनी ही  प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी  कर्जमाफीपासून वंचित राहतील, असे संकेत जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्थेने वर्तविले आहेत.वाशिम जिल्ह्यातील दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  र्मया. अकोला बँकेचे कर्जमाफीस पात्र शेतकरी संख्या एकंदरित  ७९ हजार १२८ असून, त्यापैकी ७५ हजार १७२ शेतकर्‍यांचे  आधार कार्ड रीतसर बँक खात्यांशी लिंक करण्यात आलेले  आहेत. उर्वरित चार हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे आधार  कार्ड लिंक करुन घेणे आवश्यक आहे. तथापि, ज्या शेतकर्‍यांचे आधार कार्ड अद्याप बँक खात्यांशी  लिंक झाले नसेल, त्यांना कर्जमाफीकरिता काही अवधी लागू  शकतो, याची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीयीकृत, खासगी  बँका, विदर्भ कोकण बँकेच्या पात्र सभासदांनीदेखील आधार  कार्ड लिंक करुन घेणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्‍यांनी  आपले आधार कार्ड सेतू सेंटर अथवा बँकेमध्ये जाऊन लिंक  करावे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी त्वरित नवीन  आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी