शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथील शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपीला चार दिवसाची कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:17 IST

वाशिम : शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलीसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकुण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले होते. याप्रकरणी विद्यमान न्यायालयाने गायकवाड याला २ नोव्हेंबर रोजी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

ठळक मुद्देमाहुरवेस परिसरातील मुकेश गायकवाड याच्या घरातून पोलिसांनी जप्त केला होता शस्त्रसाठा शस्त्रसाठ्यात १९ तलवारी व १८ कत्ते 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलीसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकुण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले होते. याप्रकरणी विद्यमान न्यायालयाने गायकवाड याला २ नोव्हेंबर रोजी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. वाशिम शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेला १९ वर्षीय बबलू गायकवाड हा अवैधरित्या शस्त्रे विक्रीचा व्यवसायक करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर १ नोव्हेंबरला पोलीसांनी गायकवाड याचे घरावर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये त्याचे घरातील सज्जावर १९ तलवार व १८ कत्ते आढळून आले. पोलीसांनी या शस्त्रासह बबलू गायकवाड याला अटक करून त्याचे विरूध्द भादंविचे कलम ४/२५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गायकवाड याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी गायकवाड याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातून होते शस्त्रांची खरेदी नांदेड जिल्ह्यामध्ये तलवार व ईतर धारदार शस्त्रे तयार करून ती विकणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीसोबत गायकवाड याचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यामधून गायकवाड याला कुणी शस्त्रे विकली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे आहे. 

शस्त्र विक्रीचा अवैध व्यवसाय वाशिम शहर पोलीसांनी गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येत आहे. गायकवाड गेल्या दोन-तीन वर्षापासून शस्त्रे विक्रीचा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा