शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

घरकुलाचे बांधकाम अपूर्ण ठेवणार्‍यांविरुद्ध होणार फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:44 IST

शासकीय योजनेंतर्गतच्या घरकुलांचे बांधकाम विहित मुदतीतही पूर्ण न केल्यास यापुढे संबंधित लाभार्थींना अनुदान वसुली तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्रशासन घरकुल योजनेचा आढावा घेऊन ‘अँक्शन प्लॅन’ आखणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषद यंत्रणा लागली कामाला घरकुलांचे लवकरच ‘ऑडिट’

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासकीय योजनेंतर्गतच्या घरकुलांचे बांधकाम विहित मुदतीतही पूर्ण न केल्यास यापुढे संबंधित लाभार्थींना अनुदान वसुली तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्रशासन घरकुल योजनेचा आढावा घेऊन ‘अँक्शन प्लॅन’ आखणार असल्याची माहिती आहे. दारिद्रय़रेषेखालील अनेक कुटुंबाना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने घरकुल योजना अंमलात आणली. दारिद्ररेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे (डीआरडीए) ही योजना राबविली जाते. १६ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेतला असता, घरकुलांची कामे अपूर्ण राहत असल्याचे निदर्शनात आले.या पृष्ठभूमीवर विहित मुदतीत घरकुलांचे बांधकाम पूर्ण न करणार्‍या लाभार्थींना  बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणखी एक ते दोन संधी देण्यात यावी आणि त्याऊपरही बांधकाम पूर्ण होत नसेल तर यापूर्वी दिलेले अनुदान परत घेण्याबरोबरच फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या होत्या. या सुचनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने घरकुल योजनेचे ‘ऑडिट’ करण्याची मोहीम उघडली आहे. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यात ६६१९ घरकुलं मंजूर झालेली होती. यापैकी किती घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आणि किती घरकुलाचे बांधकाम अपूर्ण आहे तसेच सन २0१६-१७ आणि २0१७-१८ मधील घरकुलांची इत्यंभूत माहिती घेतली जाणार आहे. सन २0१६-१७ आणि २0१७-१८ या कालावधीतील अनेक कामे अपूर्ण असल्याने संबंधित पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी आदींची आढावा बैठक घेऊन घरकुलासंदर्भात पुढील दिशा ठरविली जाणार आहे. आढावा सभेनंतर ‘ऑन दी स्पॉट’ भेटी देऊन पाहणी व घरकुल लाभार्थींशी संवाद साधला जाणार आहे. घरकुल बांधकामासाठी आणखी एक ते दोन वेळा संधी दिल्यानंतरही बांधकाम पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थींकडून अनुदान वसुली आणि फौजदारी कारवाई केली जाणार असल्याच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

घरकुल योजनेला ‘अर्थ’कारणाची झालर ४घरकुल योजनेला अर्थकारण आणि श्रेय घेण्याची किनार लाभत असल्याने लाभार्थींची गोची होत आहे. गावपातळीवरील अनेकजण घरकुल बांधकामाचे अनुदान काढून देण्याच्या नावाखाली लाभार्थींकडून पैसे उकळतात तसेच पंचायत समिती स्तरावरदेखील घरकुलाचे अनुदान काढून देण्याच्या नावाखाली काहीजण अर्थपूर्ण मागणी करतात, अशा तक्रारीदेखील लाभार्थींना केलेल्या आहेत. या अनुषंगानेदेखील प्रशासनाने घरकुल बांधकामाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणि अहवाल सादर केल्यानंतर किमान आठ ते दहा दिवसांत अनुदान मिळावे, यासाठी विशेष व्यवस्था करणे लाभार्थींना अपेक्षीत आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब का होतो? या दृष्टिनेदेखील प्रशासनाने आढावा घेणे गरजेचे आहे.

घरकुल योजनेचे दुहेरी लाभ घेणारे अडचणीत ! ४शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत सात-आठ वर्षाच्या फरकाने काही जणांनी दोन वेळा घरकुलाचा लाभ घेतल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगानेदेखील ग्रामसेवकामार्फत तपासणी केली जाणार आहे. एकाच योजनेतून दोन वेळा घरकुलाचे अनुदान लाटल्याचे सिद्ध झाल्यास अशा लाभार्थींविरूद्धदेखील कारवाईची दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात आढावा घेऊन घरकुलांचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातात. संबंधित लाभार्थींची बाजूही ऐकून घेतली जाईल. लाभार्थींंनीदेखील विहित मुदतीत घरकुलांचे बांधकाम करून प्रशासनाला सहकार्य करावे.- नितीन मानेप्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम.-

टॅग्स :zpजिल्हा परिषद