अनसिंग (वाशिम): गेल्या पंधरा दिवसापासून गावामध्ये एका वानराने धुमाकुळ घातला असून तब्बल १२ जणांवर हल्ले केले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. याकडे मात्र, वनविभागाचे दुर्लक्ष असून त्यांची थातुरमातुर कारवाई सुरु असून आजपर्यंत वानराला पकडण्यास वनविभागाला यश आले नाही. अनसिंग येथे गेल्या पंधरा दिवसा अगोदर वानराचा कळप आला होता. तग धरुन राहाले त्या वानराने अगोदर गावातील लोकांवर खाद्य खाण्यासाठी हल्ले केले परंतु त्यानंतर सदर वानर रस्त्यामध्ये तसेच कोणलाही घरात घुसून जो व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करीत आहे. गावामध्ये गेल्या पंधरादिवसामध्ये १२ जणांवर वानराने हल्ले केले आहेत त्यापैकी ५ जणांना जबरदस्त दातान तोडले असून नखाचा सुद्धा मार आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयग्रस्त झाले आहेत. वनविभागाच्यावतीने त्या वानराचा पाठलाग करुन धरण्याचा गेल्या पंधरादिवसापासून थातुरमातुर प्रयत्न सुरु आहे. परंतु त्यांना अद्यापही यश आले नाही. वनविभागाचे अनसिंग परिसरात नेहीच दुर्लक्ष आहे. गावात त्याची क्षरत बांधली असून त्यामध्ये कुणीही राहत नाही. वानराचा भितीमुळे गावात ठिकठिकाणी फटाके फोडून वानराला भिती दाखवण्याचा प्रयत्न सर आहे. परंत अद्यापही ४ानर गावा तच तडा धरुन बसले आहे. गावामध्ये शेतात न जात घरात राहणार्या व्यक्तीच्या संरक्षणाची लोकांना शेतांची कामे सोडून घरीच राहण्याची वेळ आली आहे.
१५ दिवसापासून वानराचा धुमाकूळ
By admin | Updated: December 11, 2014 00:16 IST