शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 12, 2015 02:01 IST

निधी खर्च करण्यास मुदतवाढ: लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश

वाशिम : लोकप्रतिनिधींनी सन २0१३-१४ या वर्षात सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी खर्च करण्यास ३१ मार्च २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा निर्णय मंगळवार, ३ मार्च रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या राज्यातील जनसुविधांच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.सन २0१३-१४ या वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व इतर मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीमधून जिल्हानिहाय कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच या कामांसाठी मंजूर रकमेच्या ८0 टक्के निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील अधीक्षक अभियंत्यांना वितरित करण्यास गत ४ मार्च २0१४ च्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली होती. वितरित करण्यात आलेला निधी गत ३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करण्याची कालर्मयादा ठरवून देण्यात आली होती. तथापि मंजूर कामांपैकी काही कामे ठरवून देण्यात आलेल्या कालर्मयादेत पूर्ण झाली नसल्याने, या विकासकामांची देयके अदा करण्यास अडचणी निर्माण झाल्याने मूलभूत सुविधांची कामे वांध्यात सापडली होती. त्यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील १00 कामे रखडली. तसेच गत ३0 सप्टेंबर २0१४ नंतर पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी ३१ मार्च २0१५ पर्यंत खर्च करण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचा निर्णय ३ मार्च रोजी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात आला. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.